महत्त्वाची बातमी अकरावीसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू,विद्यार्थी नोंदणी १९ मेपासून…- FYJC Admission 2025

Maharashtra FYJC Admission 2025 @ mahafyjcadmissions.in

दहावीचा निकाल जाहीर व्हायचा असला तरी विद्यार्थ्यांना अकरावी संकेतस्थळावर अकरावी प्रवेशासाठी नोंदणीसह अन्य माहिती आपल्या अर्जात भरून ठेवू शकणार आहेत. www.mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार असून विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया येत्या १९ मे पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. या पोर्टल वापरण्यासंबंधी काही तक्रारी असल्या Helpline Number : 8530955564 (9:00 AM to 7:00 PM) आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५ .२०२५ पासून सुरू होईल. 

mahafyjcadmissions
अकरावीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज दोन भागात विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाइन भरून घ्यावा. दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांसाठी एसएससी मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच संकेतस्थळावर (mahafyjcadmissions.in) सुरू होईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी दुसऱ्या भागाचा (पसंतीक्रम) सराव माहिती पुस्तिकेतील नमुना प्रवेश अर्जाच्या मदतीने भरावा लागणार आहे. नोंदणी अर्ज दाखल केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. नामवंत असो…वा कमी कटऑफ असणारे महाविद्यालय त्या महाविद्यालयांच्या मागील वर्षीच्या कट ऑफ गुणांसह प्राधान्यक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे महत्वाचे असणार आहे.

दरवर्षी या ना त्या कारणाने अकरावी प्रवेशात विद्यार्थी किंवा प्रवेश यंत्रणेला गोंधळाला सामोरे जावे लागते यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशातील अर्धवट माहितीमुळे प्रवेशापासून दूर राहतात. तर प्रवेश सर्वाना मिळावा या हेतून अनेकदा प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या वाढवाव्यात लागतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला केवळ ऑनलाइन अर्ज भरूनच अकरावीला प्रवेश मिळणार आहे. राज्य शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ८ मे पासून संकेतस्थळ सुरू होणार होते. परंतु, काही अडचणीमुळे ८ मे रोजी ते सुरू होऊ शकले नाही. शुक्रवार ९ मे पासून संकेतस्थळ कार्यान्वित झाले असून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड