उपशिक्षणाधिकारी पदाच्या ३४७ जागा रिक्त!! – Maharashtra Education Department Bharti 2025

Maharashtra Education Department Bharti 2025

Maharashtra Education Department Bharti 2025

 

राज्यात उपशिक्षणाधिकारी पदाच्या ३४७, नायब तहसीलदारांच्या २८१, पोलिस उपायुक्तांच्या १६१ यासह इतर विविध भागातील ५६० प्रमुख जागा रिक्त आहेत. त्या जागा रिक्त असल्याचा परिणाम प्रशासकीय सेवांवर होत आहे. त्यामुळे त्या रिक्त जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. राज्यात शासकीय विभागात जास्त पदे रिक्त असताना पदभरती मात्र अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीच्या ४३१ जागांसाठी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ (राज्यसेवा) नुकतीच घेण्यात आली. वस्तुनिष्ठ स्वरुपात होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा होती. २०२५ पासून राज्यसेवा परीक्षेत बदल होणार आहेत. ती वर्णनात्मक (लेखी) पद्धतीने होणार आहे. राज्यसेवा २०२४ मध्ये खुल्या वर्गासाठी अत्यंत कमी जागा आहेत. शासकीय सेवेतील तहसीलदार, पोलिस उपविभागीय अधिकारी अशी अनेक पदे रिक्त आहेत. या परीक्षेस दोन लाखांवर अर्ज आले आहेत. यात खुला वर्ग मुलांसाठी एकूण फक्त ७० पदे आहेत. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थीहिताचा विचार करता मुख्य परीक्षेपूर्वी राज्यसेवा २०२४ च्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड