दहावी, बारावीचा १७ नंबरचा अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त शुल्कासह भरता येणार | Maharashtra Board SSC HSC 17 No Form Apply
Maharashtra Board SSC HSC 17 No Form Apply
Maharashtra Board SSC HSC 17 No Form Apply: दहावी आणि बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी १७ नंबर फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत उशिरा अर्ज सादर करताना अतिरिक्त परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल. या परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दहावी आणि बारावीच्या खाजगी परीक्षार्थींना १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत उशिरा अर्ज करण्यासाठी अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांना नावनोंदणीची प्रक्रिया मंडळाच्या सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू आहे. शिक्षण मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना आणि संस्था प्रमुखांना विनंती केली आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रवाहामधून विशिष्ट कारणांमुळे ब्रेक घेतला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी दहावी उत्तीर्ण केली आहे, अशांना या परीक्षेद्वारे शिक्षण पूर्ण करण्यासाठी नवी संधी उपलब्ध करून द्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ही परीक्षा शिक्षण प्रवाहात परत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे.
दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अति विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगी रित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेला बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी फॉर्म नंबर १७ ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या असून ३१ ऑक्टोबर २०२४ ते १ डिसेंबर २०२४ पर्यंत विद्यार्थी प्रति दिन २० रुपये अधिनियम शुल्क म्हणून परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, खाजगी विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीची नाव नोंदणी अर्ज प्रक्रिया विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.