Adivasi Students School Scholarship Double Now महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहातील ५८ हजार ७०० विद्यार्थ्यांच्या निर्वाह, आहार आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. हि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. ही वाढ ४० ते १०० टक्क्यांपर्यंत करण्यात आल्याने राज्य सरकारवर अतिरिक्त ८३ कोटी ६६ लाखांचा बोजा पडणार आहे. आदिवासी विभाग यासाठी १४४ कोटी ७४ लाख खर्च करत होते. यापुढे यासाठी २२८ कोटी ४१ लाख खर्च होणार आहेत. राज्यात ४९० आदिवासी वसतिगृह सुरू असून त्यापैकी २८४ मुलांची व २०६ मुलींची वसतिगृहे आहेत. याची एकूण ५८ हजार ७०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या विद्याथ्यर्थ्यांना वसतिगृहात शिक्षणासाठी मिळणारे विविध भत्ते हे वाढत्या महागाईमुळे कमी पडत होते. त्यामुळे या भत्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या राज्य सरकार तर्फे घेण्यात आलेला एक स्तुत्य निर्णय आहे.

नवीन सुधारित दर पुढीलप्रमाणे (कंसामध्ये सध्याचा भत्ता)
निर्वाह भत्ता (दरमहा): विभागीय स्तरासाठी १४०० रूपये (८००), जिल्हा स्तरासाठी १३०० रूपये (६००) आणि ग्रामीण/तालुका स्तरासाठी १००० रूपये (५००)
तसेच, मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्त्यात १०० वरून १५० रुपये वाढ
शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक): इयत्ता आठवी ते दहावीसाठी ४५०० रूपये (३२००), अकरावी, बारावी व पदविका अभ्यासक्रमासाठी ५००० ररुपये (४०००), पदवी अभ्यासक्रमासाठी ५७०० रुपये (४५००), वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ८००० रूपये (६०००)
आहार भत्ता (दर महिना): महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहासाठी ५००० रपपये (३५००) आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी ४५०० रूपये (३०००)
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















