महापरीक्षा पोर्टल वरील उमेदवारांचे काय?

Mahapariksha Portal Bharti 2020

Mahapariksha Portal Bharti 2020  – लाखो उमेदवारांनी महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्राज सादर केलेलं आहेत. राज्यभरातील सुमारे तीस लाख उमेदवारांनी पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, पोलीस भरती, एमआयडीसी अशा विविध परीक्षांसाठी अर्ज भरले आहेत. मात्र,  निवडणुकीची आचारसंहिता, महापूर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे परीक्षा घेण्यात आल्या नाहीत.

राज्य शासनाच्या विविध पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत महापरीक्षा संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज केलेल्या राज्यभरातील लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.  त्यातच शासकीय पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे अर्ज केलेल्या परीक्षा होणार की नाही असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तसेच महापरीक्षा संकेतस्थळाबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्याची कार्यपद्धती बदलण्यात येत आहे. दरम्यान करोना विषाणू संसर्गामुळे राज्यात टाळेबंदी लागू केल्याने शासनासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासकीय पदांची भरती प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका  उमेदवारांना बसत आहे. ‘पदभरती परीक्षांसाठी अर्ज भरून दोन वर्षे झाली आहेत. मात्र पुढे काहीच प्रक्रिया झाली नाही.

शासनातील पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. तरीही शासन पदभरती परीक्षा घेत नाही. परीक्षा होत नसल्याने उमेदवार अडचणीत असून, शासनाने तातडीने सरळसेवाच्या परीक्षा घेण्यासाठीची कार्यवाही करावी,’ असे दीपक मोरे, समीर भोयर, अतुल जोशी, मोहन गायकवाड आदी उमेदवारांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड