सारथी, बार्टी, महाज्योती परीक्षेच्या मूल्यमापनाला स्थगिती!| Mahajyoti Application Form 2024

Mahajyoti Application Form 2024 - mahajyoti.org.in

Mahajyoti Application Form 2024

सारथी, बार्टी, महाज्योतीतर्फे अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला आहे. परीक्षा रद्द करावी व सरसकट फेलोशिप मिळावी, या मागण्यांचे निवेदन अनेक परीक्षार्थीनी विद्यापीठाकडे सादर केले होते. या निवेदनाचा विचार करून परीक्षेच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली असून, या परीक्षेच्या पेपरफुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. फेलोशिपच्या संयुक्त परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे बुधवारी सकाळी १० ते ११ या वेळेत पुणे,कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांमार्फत करण्यात आले होते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तीकडे कोणत्याही स्वरूपात उपलब्ध नव्हती. तसेच त्या
प्रश्नपत्रिकांमधील मजकूरदेखील कोणत्याही व्यक्तीला कळलेला नव्हता. संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे या परीक्षेच्या पेपरफुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत परीक्षार्थीनी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे, असे सेट समन्वयक बाळासाहेब कापडणीस यांनी सांगितले.


Mahajyoti Application Form 2024: Training is organized by Mahatma Jotiba Phule Educational and Training Center (Mahajyoti) to provide training for competitive examinations to other backward classes, exempted castes-nomadic tribes and special backward classes. After the establishment of Mahajyoti, the flow of students from across the state has increased as it has come to light that this training has been fruitful for the students; However, considering the fact that many students were not getting training opportunities due to the insufficient number of seats, the Board of Directors of Mahajyoti has approved the increase of around 3 thousand seats. Know More about Mahajyoti Application Form 2024 at below:

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राद्वारे (महाज्योती) प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. महाज्योतीच्या स्थापनेनंतर हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना फलदायी ठरल्याचे समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे; मात्र जागांची संख्या अपुरी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळत नव्हती ही बाब लक्षात घेऊन महाज्योतीच्या संचालक मंडळाने तब्बल ३ हजार जागा वाढविण्यास मान्यता दिली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महाज्योती ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत भटक्या जाती- विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षा, भरती परीक्षांकरिता मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये यूपीएससी, एमपीएससी तसेच मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण देण्यात येते. केंद्रीय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी जागा वाढवून देण्याची मागणी केलेली होती.

त्यानुसार जागा वाढविण्याचा प्रस्ताव महाज्योती संचालक मंडळासमोर आला होता. त्यानुसार दिल्ली येथील यूपीएससी प्रशिक्षणासाठी ५०० जागा, पुणे येथील यूपीएससी प्रशिक्षणासाठी ७५०, एमपीएससी राज्यसेवा प्रशिक्षणासाठी ५०० जागा, एमपीएससी संयुक्त गट प्रशिक्षणासाठी ५०० जागा, तर मिलिटरी भरती प्रशिक्षणासाठी ७५० इतक्या जागा वाढ करण्यास महाज्योतीच्या संचालक मंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. सदरचा प्रस्ताव मान्यतेकरिता उच्चाधिकार समितीला पाठविला जाणार असून, मान्यता मिळाल्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाआधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.


Mahajyoti Application Form 2023

Mahajyoti Application Form 2023 – mahajyoti.org.in : Coaching for JEE/NEET/MHT-CET after 10th is provided through Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur. The said training is for two years for which the students are given free tab and 6 GB data per day. Candidates who have passed 10th and are admitted in science stream will benefit from Mahajyoti’s JEE/NEET/MHT-CET coaching. For this, Mahajyoti Sanstha has issued to the interested candidates. The application deadline has been extended till 05 July 2023.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूरमार्फत जेईई / नीट / एमएचटी-सीईटीकरिता १० वीनंतर प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण हे दोन वर्षांसाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज सहा जीबी डेटा देण्यात येतो. १०वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जेईई / नीट / एमएचटी- सीईटी प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

५ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली

याकरिता महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना ५ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा विद्यार्थी हा इतर मागास वर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या www.mahajyoti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून, विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचनाफलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

जेईई / नीट / एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज

तसेच ज्या उमेदवारांनी या आधी जेईई / नीट / एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत. मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा उमेदवारांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Karan yelure says

    Please mala tablet dya ve mala kahi hi sadhan nhi aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड