IBPS द्वारे डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या महानिर्मिती भरती परीक्षेचा निकाल व कागदपत्रे पडताळणी तारीख जाहीर- MahaGenco Recruitment Results

MahaGenco Recruitment Results, Mahagenco Result 2019

MahaGenco Recruitment Result 2023

MahaGenco Recruitment Results -Institute of Banking Personnel Selection, Mumbai has conducted Maharashtra State Power Generation Company Ltd. Exam on 02 and 03 December 2022  for various posts like Senior Chemist, Laboratory Chemist, Instructor, Assistant Instructor, Vehicle-N-Fireman, Manager (Divisional), Deputy Manager (Divisional), Senior Manager (Fish), Manager (Fish) and Deputy Manager (Fish) Also Mahanirti Advertisement No.10 / 2019 online examination for the posts of Additional Executive Engineer (Civil), Deputy Executive Engineer (Civil) and Assistant Engineer (Civil). The list of candidates short-listed in Roll Number Order (Without Score) for Document Verification of MahaGenco Recruitment Results given below.

Students who had appeared for Mahagenco Bharti 2019 Exam can download this List as per their posts and check Below Document Verification Time Table and List of Documents required during Mahanirmiti Bharti 2023 document Verification process

महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्र. ०८/२०१९ अन्वये वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ, अनुदेशक, सहाय्यक अनुदेशक, वाहन-नि- अग्नियंत्रचालक, व्यवस्थापक (विवले), उप व्यवस्थापक (विवले), वरिष्ठ व्यवस्थापक (मासं), व्यवस्थापक (मासं) व उप व्यवस्थापक (मासं) तसेच महानिर्मिती जाहिरात क्र.१०/२०१९ अन्वये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदांची ऑनलाईन परीक्षा दि. ०२ व ०३ डिसेंबर, २०२२ रोजी पार पाडण्यात आली आहे. उपरोक्त ऑनलाईन परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे कागदपत्रे (शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात पडताळणी इत्यादीची प्रमाणपत्रे) पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची पदनिहाय यादी प्राप्त करुन घेण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंक वर  क्लिक करावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .MahaGenco Bharti Selection List

Download Mahagenco Post Wise Result PDF Form Below Links :

वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ Download
प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ Download
अनुदेशक Download
सहाय्यक अनुदेशक Download
वाहन-नि- अग्नियंत्रचालक Download
व्यवस्थापक (विवले) Download
उप व्यवस्थापक (विवले) Download
वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) Download
व्यवस्थापक (मासं) Download
उप व्यवस्थापक (मासं) Download
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Download
उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Download
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) Download

List Of Documents Required For MahaGenco Bharti 

  •  कागदपत्र जमा करण्याकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेला अर्जाची मुळ प्रत, त्यांची मूळ (Original) कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वसाक्षांकित (Self Attested) केलेला एक छायांकित संच (One Zerox copy set) स्वत:जवळ बाळगावा.
  • तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊनच उमेदवाराने कागदपत्रे जमा करण्याकरीता खाली नमूद ठिकाणी, दिवशी व वेळेवर उपस्थित राहावे. विहीत नमूद दिनांक व वेळेवर कागदपत्रे जमा करण्याकरीता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेवेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची रितसर पडताळणी केल्यानंतर, वैयक्तिक मुलाखतीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेची पात्रता यादी ही जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या व पदनिहाय अनुभवाच्या पुर्वावश्यकतेनुसार १ : ४ / १: ३ या प्रमाणात प्रसिध्द करण्यात आली आहे. सबब, कागदपत्रे पडताळणीअंती प्रसिध्द करावयाच्या वैयक्तिक मुलाखतीस पात्र ठरणा-या उमेदवारांच्या यादीत (१ : ३ / १:२), कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांचा समावेश नसेल याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
  • महानिर्मिती जाहिरात क्र. ०८/२०१९ व १० / २०१९ अन्वये ज्या पदांच्या अनुभवाच्या पूर्वावश्यकतेत एखाद्या विशिष्ट पदाच्या अनुभवाची अट असल्यास महानिर्मिती कंपनीबाहेरील उमेदवारांना सदरील पदाशी समकक्ष असल्याबाबतचे पुरावे म्हणजे अनुभवाच्या अटीत नमूद वर्षांचे वेतनपत्रक (साधारणत: माहे एप्रिल महिन्यातील वर्षनिहाय वेतनपत्रक) किंवा संबंधीत कंपनी / संस्थेचे वर्षनिहाय वेतनपत्रक प्रमाणपत्र इत्यादीचे पुरावे कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेवेळी सादर करणे बंधनकारक असेल.
  •  तसेच वर नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेनंतर १ : ३ / १ : २ या प्रमाणात पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, अधिकच्या उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येईल. तसेच याबाबतचा संपूर्ण अधिकार महानिर्मिती कंपनी राखून ठेवत आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्र. ५०२ दि. १७.०८.२०२२ नुसार सरळसेवा प्रवेशाव्दारे प्रसिध्द करण्यात येणाऱ्या पदांकरीता मागास प्रवर्गातून (Backward Class) अंतिम निवडी करीता एकूण गुणांपैकी किमान २०% गुण व खुल्या प्रवर्गातून (Open Category) अंतिम निवडीकरीता एकूण गुणांपैकी किमान ३०% गुण मिळविणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MahaGenco Document Verification Date

MahaGenco Recruitment Results

 

* वरील यादीत उमेदवारांच्या नावाचा अनुक्रम हा त्यांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या अनुषंगाने नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

उमेदवारांना सूचित करण्यात येते की, उपरोक्त यादी ही ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची उपलब्ध संख्या व समांतर आणि सामाजिक आरक्षण विचारात घेवून तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेकरीता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम निवड यादीसोबत प्रसिध्द करण्यात येतील.
कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी, कागदपत्रे जमा करणेकरीता खालील अटी व शर्तींची पुर्तता करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी असेल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१) वरील यादीतील सर्व उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय, जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळामधील प्राविण्य, शारीरिक बाधित दिव्यंगत्वाचे प्रमाण इत्यादी बाबतचे मूळ प्रमाणपत्रे ही कागदपत्रे जमा करतेवळी सादर करणे बंधनकारक राहील व ती सादर करु न शकल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
२) उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरीता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पडताळणी / छाननी न करता बोलविण्यात आले होते. त्यानुसार उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शविलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय, जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळामधील प्राविण्य, शारीरिक बाधित दिव्यंगत्वाचे प्रमाण इत्यादी बाबतचे सादर केलेल्या मूळ प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल.
३) महानिर्मिती अधिसूचना क्र.८६२१ दि.३०.०८.२०२१ अन्वये कळविल्याप्रमाणे जाहिरात क्र. ०८/२०१९ व १० / २०१९ मधील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या प्रवर्गातर्गत रुपांतरीत केली आहेत. सदरील अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे एसईबीसी प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना “अदुध” अथवा “अराखीव प्रवर्गातून गणना करण्याबाबत विकल्प विनंती अर्ज सादर करण्याचे कळविले होते. त्यानुसार प्राप्त अर्जानुसार संबंधित उमेदवारांची गणना “अदुध” अथवा “अराखीव प्रवर्गात करण्यात आलेली आहे. तसेच ज्या उमेदवारांनी कोणताही विकल्प विहित तारखेस सादर केला नव्हता, त्यांची गणना “अराखीव प्रवर्गातून करण्यात आली आहे.

Download MahaGenco Bharti Selection List

MahaGenco Recruitment Results – MahaGenco Decision Pending Candidate List : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) अंतर्गत “प्रलंबित” असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MahaGenco Recruitment Results

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaGenco Recruitment Results
यादी : http://bit.ly/3kYMCeB

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ganesh kalue more says

    Ganesh kalue more my 12th sir job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड