आरोग्य विभागाचा कडक निर्णय; प्रशिक्षण न घेतल्यास पगारातून पैसे कापणार !! – Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन प्रशिक्षण धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार ‘अ’ ते ‘ड’ वर्गातील सर्व नियमित आणि कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूलभूत प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. निर्धारित प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्यांवर पदोन्नती व आर्थिक लाभ रोखण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच प्रशिक्षणासाठी झालेला खर्च संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनातून वसूल करण्यासह प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार आहे

** पदोन्नती आणि लाभांवर स्थगिती ** 
विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याची पदोन्नती रोखली जाईल. तसेच, त्यांना वार्षिक वेतनवाढ, इतर आर्थिक लाभ आणि परदेशातील प्रशिक्षणाच्या संधी नाकारल्या जातील.

 

**गटातील सर्वांसाठी अनिवार्य प्रशिक्षण**

आरोग्य विभागांतर्गत ‘गट क’ (Group C) आणि ‘गट ड’ (Group D) मधील कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य आहे; यामध्ये परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, लिपिक आणि शिपाई यांचा समावेश आहे. सेवेत रुजू होण्यापूर्वी आणि सेवेदरम्यान, अशा टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असेल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
अपेक्षित फायदे काय आहेत?
ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा दर्जा वाढवणे, साथीच्या रोगांवर त्वरित नियंत्रण मिळवणे, रुग्णसेवेचा दर्जा सुधारणे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असल्याने रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल.
**पहिल्या वर्षापासूनच प्रशिक्षणाची रूपरेषा**
नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर एखादा कर्मचारी हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात अपयशी ठरला, तर प्रशिक्षणासाठी सरकारने केलेला खर्च त्याच्या पगारातून हप्त्या-हप्त्याने वसूल केला जाईल. हा नियम कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही लागू असेल.
Arogya Vibhag news

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra State) announces new Mega Recruitment For the more than 5 thousand vacancies to Fulfill the Vacancies For the Grade A, B, C, and D Posts like- “Medical Officer, Arogya Sevak/Sevika, Stuff Nurse, ANM, GNM, Lab Technician, Physician, Anesthetist, Pediatrician, Surgeon, Radiologist, Nephrologist, Dialysis Technician, Dental Hygienist, Medical Officer, Instructor for Hearing Impaired Children, JE, Medical Officer, Pediatrician, Physiotherapist, Audiologist, Cum Speech Therapist, Psychologist, Optometrist, etc”. Eligible candidates are directed to submit their application online through http://arogya.maharashtra.gov.in/ this Website. Date to start online application form will be live soon.  Total 5000+ Vacant Posts have been announced by Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra State) Recruitment Board, Maharashtra, in the advertisement 2026. Eligible candidates are directed to submit their application online through www.arogya.maharashtra.gov.in. Candidates are requested to read the detailed advertisement (जाहिरात PDF) carefully before applying this Arogya Vibhag Bharti 2026 – 2027 Application Process. Applicants can easily know all the latest updates of Maharashtra Health Department—Arogya Vibhag Bharti in this page. So, bookmark this page for more information about Maharashtra Health Department Bharti 2026. The PDF Advertisement will be out soon on MahaBharti.in

आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागात पदभरती प्रक्रियेबाबत खालील महत्त्वाचे अपडेट्स

वरील विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन २०२३ पदभरतीच्या अनुषंगाने गट-क व गट-ड संवर्गाची १०९४९ पदांची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यापैकी गट-क सवर्गाचे ६०४६ व गट-ड संवर्गाचे ३५१९ असे एकुण ९५६५ पदे भरुन रुग्णसेवेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. आता, विभागाच्या गट क संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील ४४७६ पदे रिक्त आहे व गट ड संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील २४६५ पदे असे एकुण ६९४१ पदे रिक्त आहेत.  यास्तव शासनास विनंती करण्यात येते की, नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व सर्व कार्यक्रम प्रमुख व उपंसचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्याचेकडील गट-क व ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासर्वीय कक्षाकडून विंदुनामावली प्रमाणित करून घेण्याबाबत व पदभरती प्रक्रीया टी.सी.एस.-आय.ओ.एन. (टाटा कंन्सलटंसी सर्विसेस लिमीटेड) अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेमार्फत करण्यात यावी याबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शनपर आदेंश व्हावेत, ही विनंती. या आरोग्य विभाग भरतीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी या लिंक वर उपलब्ध आहे. 

१. गट ‘क’ व ‘ड’ मधील ७,१९५ पदांची भरती: आरोग्य विभागात रिक्त असलेल्या ७,१९५ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती TCS iON किंवा MPSC मार्फत राबवण्याबाबत शासनस्तरावर मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.

२. ५,२२३ नवीन पदांना मंजुरी: राज्यातील २५९ नवीन/श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी ५,२२३ नवीन पदांची निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील विविध वैद्यकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे.

३. पदभरतीची प्रक्रिया: भरती प्रक्रियेसाठी राज्य, प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तांत्रिक पदांसाठी शैक्षणिक अर्हतेवर ८०% आणि उर्वरित विषयांवर २०% गुण अशी परीक्षा पद्धती निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील ५ हजार नव्या पदांच्या भरतीला गती देण्यात येणार असून  १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १,९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) पदेही लवकरच भरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरोग्य विभागाने रिक्त पदांचा तपशील मागवला आहे. या अनुषंगाने भरतीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तसेच, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, मंत्रिमंडळाने नव्या पदांना मंजुरी दिली असून या आठवड्यात भरती प्रक्रिया वेगाने राबविली जाईल. उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रलंबित निधीही आठवडाभरात वितरित ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती पूर्ण करण्यात येणार आहे. अनेक असूनही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. नव्या भरतीमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन सेवा सुरू मदत होईल. करण्यास रुग्णालयांच्या बांधकामासाठी ५०, ७०, ७५ आणि ९० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी देण्यात येणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी निधी वाढविण्याबाबत समिती स्थापन केली जाणार आहे.

आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून, या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल. तसेच आजच्या डॉक्टर्स दिनी १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १,९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची (CHO) पदेही भरली जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ व ईएसआयसी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई सुरू असून दोन-तीन संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशाराही आबिटकर यांनी दिला. या चर्चेत विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे यांच्यासह अनेक सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026: मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच आरोग्य विभागात पदभरती करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात नवीन GR जाहीर झाला आहे. या नुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. साहजिकच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. बुधवार, दि. २४ जून रोजी सरकारने एक शासन निर्णय जारी करत ५ हजार २२३ पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पदभरती संदर्भातील कार्यवाही लवकरच सुरु होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धीत एकूण २५९ रुग्णसंस्थांसाठी शासन निर्णय हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, मुकादम, सफाईगार, शिपाई, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यासह इतरही पदांचा समावेश आहे. 

Arogya Vibhag Bharti 2026 New GR

राज्य शासनाच्या ज्या आरोग्य संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत, त्यात जिल्हा रुग्णालय ठाणे, जिल्हा रुग्णालय, बीड, जिल्हा रुग्णालय अकोला, सामान्य रुग्णालय- मंचर, आंबेगाव, इचलकरंजी, सामान्य रुग्णालय, इचलकरंजी, संदर्भ सेवा रुग्णालय ठाणे, नाशिक. तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपजिलहा रुग्णालय- अंजनगाव सुर्जी, चिखली जि. बुलढाणा, वरुड जि. अमरावती, सोयगाव, धानोरा जि. गडचिरोली, माजलगाव जि. बीड, आटपाटी जि. सांगली, जत जि. सांगली, देवगड जि. सिंधुदुर्ग, दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, अमळनेर जि. जळगाव, मानत जि. परभणी, अजिंठा जि. छ. संभाजी नगर या सर्व रुग्णालयांची क्षमता ३० खाटांवरुन ५० खाटांवर वाढविण्यात येत आहे. त्यामुळे येतील रिक्त जागांची भरती होईल.

यासोबतच ३० खाटांवरुन १०० खाटांच्या रुग्णालयांमध्ये उपजिल्हा रुग्णालय- अकोट जि. अकोला, मोर्शी जि. अमरावती, जामखेड जि. अहिल्यानगर, सुपा जि. पुणे, बार्शी जि. सोलापूर, घनसावंगी जि. जालना या रुग्णालयांचा समावेश आहे. स्त्री रुग्णालय हिंगोली, नाशिक येथे १०० खाटा नव्याने निर्माण करण्यात येत असल्याने त्यासाठीही वेगळी पदनिर्मिती करण्यात येत आहे. ट्रॉमा केअर युनिट चाळीसगाव, मेहकर, वडगाव मावळ, उमरेड, कुर्डूवाडी या रुग्णालयांचाही समावेश आहे.

एवढंच नाही तर आयुष रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र, राज्यस्तरिय प्रशिक्षण केंद्र, राज्यस्तरिय औषधी भांडार या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पद निर्माण करण्यात आलेले आहेत. २५९ रुग्णसंस्थांसाठी एकूण ५२२३ पदे निर्मितीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड