Maha TAIT Exam Paper 2025 Feedback about Question, Difficulty level – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) मंगळवारी (दि.२७) राज्यभरात सुरू झाली. शहरातील सहा केंद्रांवर झालेली ही परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेचा पेपर सोपा गेला, तरी वेळेची कसरत मात्र करावी लागल्याचे परीक्षार्थी उमेदवारांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशा तीन सत्रात ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची काठीण्यपातळी कमी असल्याचे या उमेदवारांनी सांगितले. रिझनिंगचा भाग सोपा, परंतु इंग्रजी अवघड गेल्याचे हे उमेदवार म्हणाले. त्याचसोबत गणिताचे प्रश्नही अवघड गेल्याची व बहुतांश प्रश्न ५ ते ६ ओळींचे किचकट असल्याची माहिती काही उमेदवारांनी दिली. पेपर सोपा असला तरी, प्रश्न समजण्यातच बराच वेळ गेल्याचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वेळच न मिळाल्याचे बहुतांश उमेदवार म्हणाले.

Important Links For Tait Exam 2025
| Maha TAIT टेस्ट सीरीज २०२५, सर्व महत्वाचे प्रश्न, लगेच सोडवून पहा- MAHA TAIT Test Series 2025 |
| MahaTAIT 2025 परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण |
राज्यभरातून या परीक्षेसाठी २ लाख २७ हजार २२९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसाठी २७ मे ते १० जूनदरेम्यान दोन टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. शहरातील नाशिकरोड येथील फ्युचरटेक सोल्युशन, म्हसरूळ परिसरातील वेबईझी इन्फोटेक, म्हसरूळ येथील पीव्हीजी इंजिनीअरिंग कॉलेज, नाशिकरोडचे अॅपेक्स एग्जाम सेंटर, अंजनेरी येथील सपकाळ इंजिनीअरिंग कॉलेज, आडगाव येथील मेट फार्मसी कॉलेज या सहा केंद्रांवर पहिल्या दिवशी परीक्षा सुरळीत पार पडली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















