Maha TAIT चा पेपर सोपा पण वेळेची कसरत, जाणून घ्या उमेदवारांचे काय मत! – Maha TAIT Exam Paper 2025

Maha TAIT Exam Paper 2025

Maha TAIT Exam Paper 2025 Feedback about Question, Difficulty level – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) मंगळवारी (दि.२७) राज्यभरात सुरू झाली. शहरातील सहा केंद्रांवर झालेली ही परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेचा पेपर सोपा गेला, तरी वेळेची कसरत मात्र करावी लागल्याचे परीक्षार्थी उमेदवारांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशा तीन सत्रात ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची काठीण्यपातळी कमी असल्याचे या उमेदवारांनी सांगितले. रिझनिंगचा भाग सोपा, परंतु इंग्रजी अवघड गेल्याचे हे उमेदवार म्हणाले. त्याचसोबत गणिताचे प्रश्नही अवघड गेल्याची व बहुतांश प्रश्न ५ ते ६ ओळींचे किचकट असल्याची माहिती काही उमेदवारांनी दिली. पेपर सोपा असला तरी, प्रश्न समजण्यातच बराच वेळ गेल्याचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वेळच न मिळाल्याचे बहुतांश उमेदवार म्हणाले.

Maharashtra TAIT Exam 2025 Paper PDF

Important Links For Tait Exam 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha TAIT टेस्ट सीरीज २०२५, सर्व महत्वाचे प्रश्न, लगेच सोडवून पहा- MAHA TAIT Test Series 2025
 MahaTAIT 2025 परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

राज्यभरातून या परीक्षेसाठी २ लाख २७ हजार २२९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसाठी २७ मे ते १० जूनदरेम्यान दोन टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. शहरातील नाशिकरोड येथील फ्युचरटेक सोल्युशन, म्हसरूळ परिसरातील वेबईझी इन्फोटेक, म्हसरूळ येथील पीव्हीजी इंजिनीअरिंग कॉलेज, नाशिकरोडचे अॅपेक्स एग्जाम सेंटर, अंजनेरी येथील सपकाळ इंजिनीअरिंग कॉलेज, आडगाव येथील मेट फार्मसी कॉलेज या सहा केंद्रांवर पहिल्या दिवशी परीक्षा सुरळीत पार पडली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड