Maha DBT Farmer Scheme
Maha DBT Shetkari Yojana: थेट लाभ हस्तांतर (डीबीटी: डायरेक्ट बेनिफिट अॅण्ड ट्रान्सफर) योजनचे निकष बदलण्यात येणार आहे. योजनेत शेतकऱ्यांना साहित्य अथवा वस्तू घेतल्यानंतर बिले अदा करण्याची तरतुद होती. मात्र, यामध्ये वस्तू न घेताच बिल पदरात पाडून घेण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता योजनेत थेट वस्तूच शेतकऱ्यांना देण्याचा पॅर्टन राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये कृषी सहाय्यक ते थेट ग्रामसेवकांची साखळी असल्याने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
योजनेत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. नव्या निकषांनुसार ‘डीबीटी’ची कक्षा विस्तारण्यासाठी यंत्रणा तयार करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. गुणनियंत्रण विभागाबरोबरच कृषी उद्योगालाही यामध्ये जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर त्यांना लॉटरी पद्धतीने लाभ दिला जातो. यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तीन वर्षांत कधीही तो मिळू शकतो. मात्र, काही प्रकरणात योजनेचा लाभ आवश्यकतेवेळी मिळालाच नाही. परिणामी, शेतकरी गरज असताना संबंधित साहित्य स्वखचनि घेतो. लॉटरीत त्याला लाभ मिळाल्यानंतर बिले जमा करून तो लाभ त्याच्या खात्यावर जमा होतो. ही प्रणाली असली तरी सध्या काही अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. काही वेळा शेतकरी स्थलांतरित झालेला असतो किंवा त्याची गरजही संपलेली असते. तरीही सरकारी योजनेत लाभ मिळत असल्याने मध्यस्थी त्याचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कृषी विभागाच्या ५० हुन अधिक योजनांमध्ये डीबीटी प्रणालीनुसार लाभ दिला जातो असे सांगण्यात आले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















