MAH परीक्षा CET 2024: विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कारणासाठी बदलता येणार परीक्षेची तारीख| MAH CET Admit Card 2024

MAH CET Admit Card 2024

MAH CET Admit Card 2024

MAH CET Admit Card 2024: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा लोकसभा निवडणुकांमुळे विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. येत्या ५ मे रोजी होणारी पीसीएम गटातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना काही वैयक्तिक कारणासाठी बदल आवश्यक वाटत असल्यास त्यांच्याकडून तशा सूचना इमेलवर मागवण्यात आल्या आहेत. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या आणि विद्यार्थी संख्या अधिक असलेली एमएचटी सीईटी परीक्षा गेल्या सोमवारपासून सुरु झाली आहे. यामधील पहिल्या टप्यात पीसीबी ग्रुपमधून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. यानंतर पीसीएम ग्रुपची परीक्षा सुरु होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना सत्र आणि परीक्षांचा वेळा निश्चित करुन तारीख आदी माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. पीसीएम गटातील ही परीक्षा ५ मे रोजी होणार नाही. तरीही ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटत आहे. अशा सर्व उमेदवारांनी आपला विनंती अर्ज परीक्षेच्या प्रवेश पत्रासह mhtcetpcm2024gmail.com या इमेल आयडीवर पाठवावा. या संदर्भातील विनंती २६ एप्रिलपर्यंतच स्विकारली जाईल, असे सीईटी सेलने आपल्या अधिकृत सुचनापत्रात नमुद केले आहे. येत्या ५ मे रोजी होणारी पीसीएम गटातील परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


MAH CET CELL Admit Card 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAH CET Admit Card 2024: Maharashtra Common Entrance Test Cell has released an admit card for various exams Like MAH-B.Ed, MAH-L.L.B.5Yrs, MAH-BHMCT, MAH-M.P.Ed. and MAH-B.Planning. Candidates who have applied for this exam can download their MAH CET Admit Card 2024 from below link:

 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MAH CET 2024 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.  MAH B.Ed Admit Card 2024 मध्ये प्रवेश करण्यासाठी, उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक MAH B.Ed Application No आणि जन्मतारीख प्रदान करणे आवश्यक आहे. MAH B.Ed CET Hall Ticket 2024 मध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती तसेच परीक्षा केंद्राशी संबंधित तपशील, महत्त्वाच्या सूचना आणि बरेच काही असेल. एकदा उमेदवारांना MAH B.Ed प्रवेशपत्र 2024 मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर, प्रवेशपत्र 2024 मध्ये उपस्थित असलेले तपशील त्याच्या अचूकतेसाठी तपासा. याशिवाय उमेदवार परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या सूचनाही तपासू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील किंवा थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

उमेदवारांना अॅडमिट कार्डवर अलिकडच्या काळातील छायाचित्र लावायचे आहे. नोंदणी करताना जे छायाचित्र पाठवले असेल, ते प्राधान्याने लावल्यास उत्तम. अॅडमिट कार्ड आणि ओळखपत्रासह उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल.

B.Ed. CET 2024 Download your Hall ticket

????Visit the official website
????Fill the required login credentials –
1.Application no. &
2. Date of Birth
3. Enter Security Pin
????Click on the submit button to download the admit card.

Link???? To Download Admit Card for CET- 2024

SN CET Name Department Link
1 MAH CET Admit Card 2024 Higher Education Click Here to View Admit Card

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड