मागेल त्याला शेततळे

Magel Tyala Shettale

Magel Tyala Shettale Yojana Details & Application process details are given below. Also read the Eligibility details For this Yojana. Also the respective Links to apply online are given here. The updates & details about this are given here. So all updates, Yojana of Shettale is very useful for the Farmers in India.

कोरडवाहू शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनीवर पिके घेताना पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. काही शेतजमिनींवर विहिरीसुद्धा नसतात. मराठवाडा व विदर्भात परिस्थिती हलाखीची असते. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार हे जिल्हेदेखील या परिस्थितीतून सुटलेले नाहीत. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पूरक व्यवस्था म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेकडे पाहिले जाते.
शेततळ्यांचा लाभ घेतांना वैयक्तिक व सामुदायिक अशा दोन प्रकारे लाभ घेता येतो. सामुदायिक शेततळ्याचा लाभ घेताना लाभार्थ्यांनी रुपये १०० च्या बॉंडसह अर्ज सादर करणे बंधनकारक असते. आत्महत्याग्रस्त व दारिद्र्यरेषेखालील शेतकर्‍यांना प्राधान्य असल्यामुळे त्याविषयीचे प्रमाणपत्र अर्ज सादर करणे, ‘आपले सरकार’ वेब वर स्वत:ची प्रोफाईल तयार करणे व महा-ई सेवा केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. कोकण विभाग वगळता इतर जिल्ह्याकरिता लक्ष्यांक, अर्जदार शेतकर्‍याकडे किमान १.५ एकर (०.६० हेक्टर) जमीन धारणा असणे गरजेचे आहे. त्या अर्जदार शेतकर्‍याने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. तसेच त्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी व मागील पाच वर्षात पैसेवारी ५०% पेक्षा कमी किमान एक वर्ष तरी घोषित झालेली असावी. दारिद्र्यरेषेखालील कुटुंब व आत्महत्याग्रस्त वारसास व वय ज्येष्ठता यादीनुसार पात्र लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात आले आहे. किमान आकारमान इनलेट आऊटलेटसह १५ बाय १५ बाय ३ मी. ते ३० बाय ३० बाय ३ तसेच इनलेट आऊटलेट विरहित शेत तळ्यासाठी आकारमान किमान १५ बाय १५ बाय ३ मी. ते २० बाय १५ बाय ३ मी. असणे बंधनकारक ठरवले आहे. तसेच पात्र अनुदान रकमेव्यतिरिक्त उर्वरित सर्व खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे बंधनकारक राहील, असे काही निकष लावण्यात आले आहेत.

Documents For Magel Tyala Shettale

अर्जदाराला खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.

  • जातीचा दाखला
  • ७/१२ चा उतारा
  • ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र)
  • आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी)
  • दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
  • स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
  • आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)

Rules of Magel Tyala Shettale

शेततळ्यासाठी अटी / नियम :

  • कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
  • कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
  • लाभार्थींना स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक /कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स सह सदर करावा .
  • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी .
  • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकर्याची राहील
  • पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
  • लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे .
  • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
  • शेततळ्याला इनलेट आउटलेट ची सोय असावी .
  • शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरिकरण अर्जदाराला स्वखर्चाने करावे लागेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मागेल त्याला शेततळे 

मागेल त्याला शेततळे – दिनांक 9 फेब्रुवारी, 2016 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ”मागेल त्याला शेततळे” योजना मंजूर आणि महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटीची तरतुद.

या योजनेतर्गत वरीलपैकी कोणतेही एका आकारमानाच्या शेततळ्याची शेतकऱ्यास मागणी करता येईल.यामध्ये जास्तीत जास्त 30X30X3 मी आकारमानाचे व कमीत कमी 15X15X3 मी (इनलेट,आउटलेट सह)तर 20X15X3 मी (इनलेट विरहीत)आकारमानाचे शेततळे घेता येईल.लाभार्थीची मागणी व शेत परिस्थिती नुसार शेततळ्याची लांबी रुंदी कमी जास्त करण्यास मुभा राहील आणि मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त येणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे.शेततळ्याच्या आकारमानानुसार देय अनुदान रक्कम भिन्न भिन्न असली तरी देय अनुदानाची कमाल रक्कम रु.५०,०००/- इतकी राहील.रु.५०,०००/- पेक्षा जास्त येणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे. योजनेतर्गत जास्तीत जास्त ५ शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरित्या समुदायिक शेततळे घेता येईल मात्र या शेततळ्याचे आकारमान अनुज्ञेय आकाराच्या प्रमाणात राहील.लाभार्थी शेतकऱ्यास स्वतः/ माजुराद्वारे /अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी /पोकलेन मशीन)सह्याने आपले शेततळे पूर्ण करता येईल.काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान सबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.      

  • “मागेल त्याला शेततळे” योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी  “मागेल त्याला शेततळे” योजना घेण्यात येत आहे.
  • टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील 5 वर्षात एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहिर केली आहे, अशा गावांमध्ये प्राधान्याने पहिल्या टप्प्यात 51,500 शेततळी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 51,500 शेततळी घेण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त मागणी प्राप्त झाल्यास त्याप्रमाणात लक्षांकामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
  • दारिद्य रेषेखालील व्यक्ती (बीपीएल) व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देवून प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे.
  • तसेच शेततळयाची मागणी करणाऱ्या अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात मोठया आकारमानाचे शेततळे 30 *30*3 मीटर असून सर्वात कमी 15*15*3 मीटर आकारमानाचे आहे.
  • 30x30x3 मीटर शेततळयासाठी रुपये 50,000/- इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे.  इतर शेततळयासाठी आकारमानानुसार अनुदान देय होईल.  रुपये 50,000/- पेक्षा जास्त खर्च झााल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांने स्वत: खर्च करावयाचे आहे.
  • शेततळयाची मागणी करण्यासाठी अर्ज Onlineपध्दतीने सादर करावयाचे आहेत.
  • जिल्हा पातळीवर मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व समन्वय समिती, या योजनेवर देखरख करेल.  योजना अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल.  तालुका पातळीवर समिती शेततळयाला मान्यता देईल.
  • शेततळी बांधण्यासाठी मशिनचा वापर अनुज्ञेय आहे.
  • ”मागेल त्याला शेततळे” योजना कृषि आयुक्तालया मार्फत राबविण्यात येणार आहे.
  • शेततळयाचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
  • ”मागेल त्याला शेततळे” या योजनेसाठी लागणारा निधी Drought Mitigation Measuresयोजनेत्तर या अंतर्गत सन 2015-16 मध्ये रुपये 50 कोटी पुरवणी मागणीव्दारे व सन 2016-17 मध्ये रुपये 207.50 कोटी इतका निधी मदत व पुनर्वसन विभागा मार्फत उपलबध करुन देण्यात येणार आहे.  रोजगार हमी योजना विभाग नोडल विभाग म्हणून ही योजना कार्यान्वीत करीत आहे.

शेततळ्यासाठी अटी / नियम काय असतील?

  • कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक यांनी निशित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
  • कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
  • लाभार्ठीने स्वताच राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक /कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स सह सदर करावा .
  • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी .
  • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकर्याची राहील . ७)पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
  • लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे .
  • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदने हे बंधनकारक राहील
  • इनलेट आउटलेट ची सोय असावी . शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरिकरण स्वखर्चाने करावे .

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Sagar rajendra nagare says

    State when the online form will start

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड