LLB प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; येथे बघा सविस्तर माहिती
LLB Admission Timetable
LLB Admission Timetable
LLB Admission Timetable: LLB Admission Time Table Announced. Process cap round till 10th December 2022. Currently, the schedule of two cap rounds has been announced, after which admissions will be given through the college level round. Further details are as follows:-
विधी शाखेच्या तीन वर्षे कालावधी व पाच वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रम (एलएलबी) प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॅप राउंडची संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सध्या दोन कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानंतर महाविद्यालय स्तरावरील फेरीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- इयत्ता बारावीनंतर पाच वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध असून, पदवीधर विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
- सीईटी सेलतर्फे या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे.
- त्यानुसार तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी नोंदणी करून ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे.
- पाच वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत मुदत असणार आहे.
- पहिल्या व दुसऱ्या कॅप राउंडअंतर्गत स्वतंत्र अल्फाबेटिकल गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना त्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत.
- ३ वर्षे कालावधीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० डिसेंबरपर्यंत असणार आहे.
- ५ वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाचे प्रवेश २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत.
प्रमाणपत्र सादरीकरणास मुदत
विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कागदपत्रे उपलब्ध करावी लागणार आहेत. त्यानुसार जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची दुसऱ्या कॅप राउंडच्या अंतिम तारखेपर्यंत अंतिम मुदत असेल. विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
LLB Admission 2022 Timetable
प्रवेशाचे वेळापत्रक असे-
- तपशील ५ वर्षे एलएलबी ३ वर्षे एलएलबी
- नोंदणी व ऑप्शनफॉर्म भरणे ६ ऑक्टोबरपर्यंत १० ऑक्टोबरपर्यंत
- अल्फाबेटिकल गुणवत्ता यादी प्रसिद्धी १० ऑक्टोबर १५ ऑक्टोबर
- हरकत, तक्रार नोंदविण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत १७ ऑक्टोबरपर्यंत
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी १३ ऑक्टोबर १८ ऑक्टोबर
- पहिली निवड यादी प्रसिद्धी १५ ऑक्टोबर २१ ऑक्टोबर
- विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत १५ ते १८ ऑक्टोबर २२ ते २९ ऑक्टोबर
- दुसऱ्या कॅप राउंडसाठी नोंदणी २० ते २३ ऑक्टोबर ४ ते १० नोव्हेंबर
Table of Contents