लिपिक-टंकलेखक पदाच्या अर्जांची ‘मॅट’ने केली नामंजुरी छत्रपती संभाजीनगर, ता. १२ – राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने लिपिक-टंकलेखक पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, कौशल्य चाचणीदरम्यान तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. आयोगाने ही मागणी फेटाळल्यानंतर सुमारे साडेतीनशे उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) अर्ज दाखल केले होते. Lipik Tanklekhak Bharti Latest News 2025 Update

चाचणीवेळी की-बोर्ड नीट कार्यरत नव्हता, बटणे चालत नव्हती, अशा विविध तांत्रिक समस्या असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. मॅटचे न्यायिक सदस्य न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी सर्व अर्ज नामंजूर केले. त्यामुळे प्रलंबित असलेल्या सात हजार उमेदवारांच्या नियुक्तीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. लिपिक-टंकलेखक पदासाठी केवळ लेखी परीक्षेचा विचार होणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. कौशल्य चाचणी फक्त पात्रता निकष म्हणून घेतली जात होती, त्यात गुणांचा समावेश नव्हता.
१ ते ४ जुलै २०२४ या कालावधीत कौशल्य चाचणी पार पडली. तसेच, १ ते ३ जून २०२४ दरम्यान पात्रता चाचणी घेण्यात आली होती. ४ जून रोजी झालेल्या चाचणीत अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. उमेदवारांच्या वतीने अॅड. अमोल चाळक यांनी न्यायाधिकरणात युक्तिवाद केला.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















