Laxmi Pujan Muhurat Maharashtra – दिवाळीच्या पवित्र पर्वात लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस मानला जातो. महाराष्ट्रात या सणाला विशेष अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. अश्विन अमावस्येच्या सायंकाळी होणारे हे पूजन सुख, समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरी केले जाते. आपल्या महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांमध्ये चैतन्य पाहायला मिळते. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते, नवीन वस्त्रे परिधान केली जातात आणि घराची स्वच्छता करून दारासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळाची मुहूर्त वेळ साधून लक्ष्मीपूजनाला सुरुवात होते. पाटावर लाल किंवा पांढरे वस्त्र अंथरून त्यावर अक्षता, धान्याची रास आणि कमळावर विराजमान असलेल्या देवी लक्ष्मीची तसेच भगवान श्रीगणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापना केले जाते. या पूजेमध्ये सोन्याचे दागिने, रोख पैशांची पाकीटे, व्यापारी वर्ग आपली हिशोबाची नवी पुस्तके (चोपडा) आणि काम करणाऱ्या हत्यारांची विशेष पूजा केली जाते. घरातील मुख्य ठिकाणी तांदळाची वा पांढऱ्या रांगोळीची स्वस्तिक चिन्हे काढून दिव्यांची रोषणाई केली जाते. नैवेद्यामध्ये प्रामुख्याने बताशे, लाह्या, साखरेच्या गाठी, बत्तासे आणि फराळातील लाडू-करंज्यांचा समावेश असतो. यादरम्यान घरातील प्रत्येक कोपरा उजळून निघतो आणि अंधकार दूर सारून तेजामध्ये प्रवेश करण्याचे प्रतीक म्हणून दिवे लावले जातात. थोडक्यात सांगायचे तर, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेची जपणूक करणारा हा सण माणसाला कष्टाचे महत्त्व, आपुलकी आणि समृद्धीचा संदेश देणारा ठरतो. चला तर आजच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त कोणता आहे आणि अन्य महत्वाची माहिती जाणून घेऊया.

रविवार 8 नोव्हेंबर 2026,भारतीय सौर १७ कार्तिक शके १९४८, आश्विन कृष्ण चतुर्दशी सकाळी ११-२७ पर्यंत आहे तसेच या वर्षीचे दीपावली, महाराष्ट्रात लक्ष्मीकुबेर पूजन सायंकाळी 06.00 ते रात्री 08:33 करणे शुभ आहे. , अलक्ष्मी नि:स्सारण आणि दर्श अमावास्या आहे. धन लक्ष्मी योग, अनफा योगाचा प्रभाव असेल. हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्यामधील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरी केली जाते. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी अमावास्या सुरू होईल आणि 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. उदया तिथी आणि प्रदोष काळातील अमावास्या लक्षात घेता, 8 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन साजरे केले जाईल.
यात महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनुसार लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त (संध्याकाळ) खाली दिलेलं आहे, जवळपासच्या शहरात आपण तोच शुभ मुहूर्त आहे त्या नुसार पूजा करावी:
- नागपूर: संध्याकाळी ५:५९ ते ७:५८ वाजेपर्यंत
- मुंबई: संध्याकाळी ६:२७ ते ८:२७ वाजेपर्यंत
- पुणे: संध्याकाळी ६:२४ ते ८:२४ वाजेपर्यंत
- नाशिक: संध्याकाळी ६:२२ ते ८:२२ वाजेपर्यंत
- छत्रपती संभाजीनगर: संध्याकाळी ६:१६ ते ८:१६ वाजेपर्यंत
- कोल्हापूर: संध्याकाळी ६:२५ ते ८:२६ वाजेपर्यंत
लक्ष्मीपूजन: महत्त्व आणि पूजा विधी
दिवाळीच्या पवित्र पर्वात लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस मानला जातो. महाराष्ट्रात या सणाला विशेष अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे.
१. लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी आणि साहित्य
- स्थापना: पाटावर लाल किंवा पांढरा रेशमी कापड अंथरावा आणि त्यावर तांदळाची रास ठेवावी.
- मूर्ती स्थापना: श्रीगणेश आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्थापन करावी.
- साहित्य: हळद-कुंकू, अक्षता, अष्टगंध, फुले, दुर्वा, कलश, सुट्टे पैसे, सोन्या-चांदीचे दागिने आणि नवीन वही (चोपडा).
२. पूजेची सविस्तर पद्धत (विधी)
- आचमन आणि पवित्रीकरण:
हातात पाणी घेऊन आचमन करावे आणि शरीरावर व पूजेच्या साहित्यावर पाण्याचा शिडकावा करून स्वतःला आणि परिसर पवित्र करावा. - गणेश पूजन आणि कलश स्थापन:
सर्वप्रथम विघ्नहर्ता भगवान श्रीगणेशाचे पूजन करावे. गणपतीला हळद-कुंकू, अक्षता, फुले व दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर कलशाची पूजा करावी. - माता लक्ष्मीचे आवाहन:
माता लक्ष्मीचे ध्यान करून कमळाचे फूल किंवा अक्षता वाहून देवीचे आवाहन करावे. हळद-कुंकू, अष्टगंध, लाल रंगाची फुले आणि अत्तर अर्पण करावे. - कुबेर आणि चोपड्याची पूजा:
धनाचे रक्षक भगवान कुबेर यांचे स्मरण करावे आणि नवीन चोपड्यावर किंवा वहीवर कुंकवाने ‘शुभ-लाभ’ व ‘स्वास्तिक’ काढून त्याची पूजा करावी. - नैवेद्य आणि आरती:
माता लक्ष्मीला बताशे, लाह्या, साखरेच्या गाठी किंवा गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. धूप, दीप ओवाळून मनोभावे आरती करावी.
३. मंत्र
पूजेदरम्यान खालील मंत्राचा जप करावा:
“ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुप्रियायै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥”
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















