Latur Kotwal Bharti 2026.
Latur Kotwal Bharti 2026: उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भाधीन शासन निर्णयांमध्ये विहित केलेल्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणाऱ्या निवड समितीमार्फत राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण २९१२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार दि. ३१.०५.२०२६ रोजी लातूर जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण ६२ पदे रिक्त आहेत.
सदर रिक्त पदांची भरती करताना संदर्भाधीन क्र. २ मधील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी, नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता निवड समितीने घेणे आवश्यक आहे. तसेच, सदर भरती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत दि. ३०.११.२०२६ पूर्वी पूर्ण करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने, संदर्भीय शासन निर्णय क्र. ०१ व ०२ अन्वये महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दि. ०५.०९.२०१३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे कोतवाल भरती प्रक्रिया पारदर्शक, नियमानुसार व विहित कालमर्यादेत पार पाडण्यासाठी खालीलप्रमाणे निवड समिती गठीत करण्यात यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महसुल सेवक (कोतवाल) भरती कालबध्द कार्यक्रम-२०२६


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Latur Kotwal Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/WxURKInUY |
| ✅ अधिकृत वेबसाईट | latur.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















