बेरोजगार तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य शिकवून रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण १८ क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी ३१ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख ठरविण्यात आली आहे.

म्हणूनच, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पोर्टलवर लगेच अर्ज भरावा, असा सल्ला कॉर्पोरेट मंत्रालयाच्या पश्चिम विभागानं दिला आहे. या योजनेअंतर्गत ५०० कंपन्यांबरोबर करार करण्यात आला असून, प्रत्येक उमेदवाराला वर्षाला ६६ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. त्यात प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनीकडून ५०० रुपये आणि केंद्र सरकारकडून ४५०० रुपये असे मिळून महिन्याला ५,००० रुपये दिले जातील.
योजनेसाठी पात्रता आणि अटी:
- उमेदवाराचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावं, किंवा घरात कोणीही सरकारी नोकरीत नसावा.
- उमेदवार पूर्णवेळ बेरोजगार असावा आणि वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावं.
- योजनेअंतर्गत मिळणारं आर्थिक साहाय्य थेट उमेदवाराच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र व गोवा विभागाच्या नोडल अधिकारी अपर्णा मुडियम यांनी दिली.
- दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, आयटीआय शिक्षण पूर्ण केलेले पण बेरोजगार असलेले उमेदवार पात्र असतील.
- आयआयटी, आयआयएम किंवा तत्सम उच्च शिक्षण घेतलेल्यांना या योजनेत प्रवेश नाही, कारण त्यांच्याकडे आधीच पुरेसं कौशल्य असतं, असं उपसंचालक ऋतुजा बनकर यांनी स्पष्ट केलं.
विदर्भात किती संधी उपलब्ध?
ही योजना बेरोजगार तरुणांना १ वर्ष कौशल्य शिक्षणाची संधी देते. देशभर १ लाखापेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात १५,००० संधी उपलब्ध असून, त्यात विदर्भातील अनेक उमेदवारांना संधी मिळू शकते.
संतोष कुमार, प्रादेशिक संचालक, कॉर्पोरेट मंत्रालय.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















