JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लाडकी लेक योजनेसाठी ऑनलाईन अर्जासाठी नवीन लिंक सुरु, पूर्ण माहिती- Ladki Lek Yojana Online Application

Ladki Lek Yojana Online Application – महाराष्ट्रात जन्म झालेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करताना आणि त्यांच्या शिक्षणाला भक्कम आर्थिक हातभार लावण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या लोकप्रिय ‘लेक लाडकी योजना’ (Lek Ladki Yojana) बाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. या नवीन बातमी मुले अनेक पालकांना दिवाळीच्या वेळी आनंद मिळाला आहे. आता या योजनेच्या लाभासाठी अर्जदारांना अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागणार नसून, घरबसल्या ‘महाडीबीटी २.०’ (MahaDBT 2.0) पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साठी ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झाले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केली असून, यामुळे राज्यातील हजारो पात्र कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘लेक लाडकी’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांतील मुलींच्या जन्मापासून ते अगदी वयाच्या १८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांवर एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते. याअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यास ७ हजार रुपये, तर ११ वी मध्ये प्रवेश घेतल्यावर ८ हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा होते. तसेच, जेव्हा मुलगी १८ वर्षांची वयाची होते आणि ती अविवाहित असते, तेव्हा तिला अंतिम टप्प्यात तब्बल ७५ हजार रुपयांची भरीव रोख रक्कम मिळते. 

Ladki Lek Yojana Online Application

तर आता लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. यापूर्वी लेक लाडकी योजनेसाठी अर्जदारांना नजीकच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात होती. पुढे अर्जाची छाननी करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. तसेच अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जावे लागत होते. शासनाच्या विविध योजनांच्या सूचनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतर (डिबिटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आता अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही प्रमुख निकष ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार, लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक असून त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र ठरतात. पूर्वी या योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष अंगणवाडीत जाणे आणि कागदपत्रांची मोठी पूर्तता करावी लागणे बंधनकारक होते. परंतु, आता प्रक्रियेत सुसूत्रीकरण करत महाडीबीटी पोर्टलवर ही सुविधा आणल्यामुळे कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यभरात जवळपास तीन लाखांच्या आसपास पात्र मुलींना पहिला लाभ यशस्वीपणे वितरीत करण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक झाल्यामुळे दुर्गम भागातील किंवा अंगणवाडी केंद्र दूर असलेल्या नागरिकांनाही आता विनासायास अर्ज करणे शक्य होणार आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बालविवाहांना आळा घालणे आणि त्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहित करणे या उद्देशापोटी सुरू केलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Apply Online For Ladki Lek

 

ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया (How To Apply For Ladki Lek Yojana Online Step-by-Step)

  1. पोर्टलला भेट द्या:महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर ‘MahaDBT 2.0’ ला भेट द्या.
  2. नोंदणी / लॉगिन करा:नवीन वापरकर्ता असल्यास आधार क्रमांकाच्या मदतीने नवीन नोंदणी (New Applicant Registration) करा किंवा Existing User म्हणून लॉगिन करा.
  3. विभाग व योजना निवडा:‘महिला व बाल विकास विभाग’ (Women and Child Development Department) निवडा. त्यानंतर ‘लेक लाडकी योजना’ या पर्यायावर क्लिक करून ‘Apply’ निवडा.
  4. माहिती भरा व पडताळणी करा:मुलगी, पालकांचे नाव, पत्ता, रेशन कार्ड प्रकार आणि बँक खात्याचा तपशील अचूक भरा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  5. कागदपत्रे अपलोड करा:डिजीलॉकरमधून कागदपत्रे सिंक करा किंवा आवश्यक स्कॅन फाइल्स (PDF/JPG) अपलोड करा.
  6. अर्ज सबमिट करा व पोचपावती जतन करा:सर्व भरलेली माहिती तपासून ‘Submit’ वर क्लिक करा. मिळालेली अर्ज पोचपावती (Application ID/Receipt) डाउनलोड करून प्रिंट काढून किंवा सेव्ह करून ठेवा.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड