महिला दिना निमित्त राज्य सरकारने लाडक्या बहिणींनसाठी आनंदाची बातमी सांगितली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता ७ मार्चपर्यंत वितरित केला जाईल. मात्र, आता थोडा विलंब होणार असून लाडक्या बहिणींना उद्या (८ मार्च) हप्ता मिळणार आहे. हे दोन महिन्याचे पेमेंट सोबत मिळणार असल्याने लाडक्या बहिणींना मोठो रक्कम एकत्र मिळणार आहे.

आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी लाडक्या बहिणींना हप्ता दिला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. आचारसंहिता असली तरीही प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर देण्यात आला आहे.
त्याचबरोबर, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा, यासाठी पंतप्रधानांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
किती महिलांना मिळणार लाभ?
विधानपरिषदेत यासंदर्भात चर्चा झाली असून २ कोटी ५२ लाख महिलांना या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे.
लाभार्थ्यांची संख्या वाढली!
डिसेंबर २०२४: २ कोटी ४६ लाख महिलांना १५०० रुपये मिळाले.
जानेवारी २०२५: २ कोटी ४१ लाख महिलांना हप्ता मिळाला.
फेब्रुवारी आणि मार्च २०२५: २ कोटी ५२ लाख महिलांना लाभ मिळणार.
एकूण किती रक्कम मिळणार?
आतापर्यंत महिलांना ७ हप्त्यांचे १०,५०० रुपये मिळाले आहेत.
आता फेब्रुवारी आणि मार्चचा मिळून ३,००० रुपये मिळणार असून, एकूण १३,५०० रुपये खात्यात जमा होतील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















