बहिणींसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! – Ladki Bahin Yojana New Payment Amount
Ladki Bahin Yojana New Payment Amount
Ladki Bahin Yojana New Payment Amount
Ladki Bahin Yojana New Payment Amount: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलग सभा घेत महायुतीने पुन्हा सरकार स्थापन केल्यास ‘लाडकी बहिण’ योजनेचे अनुदान वाढवून प्रति लाभार्थ्याला दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कोल्हापूरमधील सायंकाळच्या सभेत बोलताना शिंदे यांनी महायुती जिंकल्यास लागू होणाऱ्या १० कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना दरवर्षी १५,००० रुपयांची आर्थिक मदत, सर्व जोडण्या धारकांना वीजबिलात ३०% सवलत यांचा समावेश आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इतर आश्वासनांमध्ये शिंदे यांनी २५,००० महिलांची पोलीस दलात भरती, अत्यावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे, शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीवर २०% अनुदान, अंगणवाडी सेविकांना प्रति महिना १५,००० रुपये अनुदान आणि २५ लाख रोजगार निर्मितीचा उल्लेख केला. तसेच, एक लाख युवकांना १०,००० रुपये मासिक स्टायपेंड देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
यापूर्वी सातारामधील सभेत शिंदे यांनी दावा केला की, महाविकास आघाडी (MVA) सत्तेवर आली तर ते ११ लोककल्याणकारी योजना बंद करण्याची धमकी देत आहेत. यात लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण यांचा समावेश आहे. “मात्र, आम्ही ते होऊ देणार नाही, जरी त्यासाठी शंभर वेळा जेलमध्ये जावं लागलं तरी,” असं शिंदे यांनी ठामपणे सांगितलं.
आज महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सरकार या योजनेची रक्कम वाढवण्याचे संकेत आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील, हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्हीही हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारांवर थांबणार नाही, हे दीड हजार, पुढे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. सावत्र भावांना धडा शिकवा ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेला काँग्रेस कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार तर आडवाच पडणार आहे. हा कुणाचा आहे, याची पार्श्वभूमी तपासा. उच्च न्यायालय माझ्या बहिणीवर अन्याय करणार नाही. विरोधकांची याचिका मुंबईत फेटाळली. आता पुन्हा नागपुरात कोर्टात गेले. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. या सावत्र भावांना धड़ा शिकवा, असे आवाहन मुख्यमंत्री शिदे यांनी केले. ‘सुरक्षित बहीण’ची हमी आम्ही सुरक्षित बहीणदेखील देणार, महिला अत्याचारातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सरकार कोर्टात करणार. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारमध्ये बसलेले भाऊ घेतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. हि सभा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीचे वितरण शनिवारी रेशीमबाग मैदानावर हि घोषणा आयोजित सोहळ्यात करण्यात आले. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेधे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, माजी आमदार आशिष देशमुख, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, राजू पारवे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. माझ्या बहिणींचे आहेत. त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू. करोडो बहिणींच्या चेहन्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे. रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पैसे दिलेत.
योजनेने सर्व रेकॉर्ड तोडले आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी व लोकप्रिय झालेली योजना आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना फसवी आहे, जुमला आहे, पैसे येणार नाहीत, वाट बघत बसा, असे विरोधक म्हणायचे. सरकार पैसे काढून घेईल. त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या म्हणाले. पैसे यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काळे पडले. ‘बुरी नजरवाले, तेरा मुह काला’ असा चिमटा घेत हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते. हे बँकेत महिलांच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे. विरोधक कितीही काही म्हटले तरी ही योजना सरकार बंद होऊ देणार नाही नाही. नाही, असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा, असे आवाहनही त्यांनी लाडक्या बहिणींना केले.
Comments are closed.