लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा वाढली आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सात हप्त्यांचे वाटप झाले असले तरी, फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. अनेक तर्क-वितर्क सुरू असताना, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले. ते म्हणाले, “या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा संतुलित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वेगवेगळ्या योजनांचा ताण आमच्या बजेटवर असला तरी, आम्ही आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
याच पार्श्वभूमीवर, त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असले तरी, योजनेचे नियम पाळूनच लाभार्थ्यांना मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक लोकांना शासकीय मदत देणारे राज्य ठरेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या परभणी येथील कार्यक्रमात 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी पुढील आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल, असे सांगितले होते. मात्र, फेब्रुवारी महिना संपला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याने विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण 3,000 रुपये मार्च महिन्यात एकत्र मिळण्याची शक्यता आहे. यामुळे लाभार्थी महिलांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळू शकते.
महिला लाभार्थ्यांची वाढती चिंता
लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सरकारकडून वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी, रक्कम खात्यात जमा होईपर्यंत महिलांची चिंता कायम राहणार आहे. आता मार्च महिन्यात दोन्ही हप्ते मिळतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















