JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लाडकी बहीण मध्ये आमूलाग्र बदल- तक्रारींच्या आधारेच लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी होणार!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेचा मुकुट मिळवून देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थीच्या अर्ज छाननीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाने विधानसभेतील विजयानंतर सरकारला आता लाडक्या बहिणींची गरज संपली असल्याची टीका केली आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या अर्जाची पुन्हा छाननी होणार नसून केवळ तक्रारीच्या आधारेच या योजनेतील लाभार्थीच्या अर्जाची छाननी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवत असताना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. Mazi Ladki Bahin Yojana Online Form.

 

Ladki Bahin Update details

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

२ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाही. त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात. मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील. मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या. आता आल्यात की नाही, ते मला माहिती नाही. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नाही. अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना जर छाननी करायची असेल तर तक्रारीच्या आधारावरच केली जाईल. भविष्यात अशी छाननी होणार आहे की नाही, याबाबत मी आता भाष्य करू शकत नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चार नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. उर्वरित लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी झाला नाही, विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवार, ७ डिसेंबरपासून सुरू झाले. नवनिर्वाचित आमदारांचा यावेळी शपथविधी आयोजित केला होता. पहिल्या दिवशी १७३, तर दुसऱ्या दिवशी १०६ लोकप्रतिनिधीना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी शपथ दिली. उर्वरित आमदारांचा सोमवारी शपथविधी पार पडला. राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्यापासून शपथविधीला सुरुवात झाली. उत्तमराव जानकर, विनय कोरे, सुनील शेळके यांचा विधानसभेत शपथविधी पार पडला. या विशेष अधिवेशनात २८३ सदस्यांनी शपथ घेतली.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड