महिलांना मासिक १ हजार २०० रुपये देणारी ‘लाडकी बहीण’ योजना राज्यात कार्यान्वित होणार! – Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे निकालात भाजपा, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसला दुहेरी आकडा गाठता आला नाही. काही महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यासाठी महायुती सरकारने तयारी सुरू केली असून, मध्य प्रदेश शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आखली जात असून, पहिल्या टप्प्यात दारिद्रय रेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये मिळणार आहे. दारिद्रय रेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ मिळणार आहे. सदर रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली असून, त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले असल्याची माहिती आहे.
या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मध्यप्रदेशात जाऊन घेतली योजनेची माहिती : मध्यप्रदेशात या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1250 रुपये दिले जातात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांना खूश करण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना अंमलात आणण्यासाठी महायुती सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे. याकरता या योजनेची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाऱ्यांचं पथक अलीकडंच मध्यप्रदेशला जाऊन आलं. या पथकानं मध्यप्रदेशमधील ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ या योजनेचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला. 27 जूनपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये : समाजातील आर्थिक, दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना महत्त्वाची असणार आहे. या योजनेमुळे महिला स्वतः आत्मनिर्भर होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1200 ते 1500 रुपये लाभार्थीच्या बँक खातात थेट जमा होणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील 90 ते 95 लाख महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.
Comments are closed.