महत्वाचे-तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? – Ladki Bahin Payment not Received
Ladki Bahin Payment not Received
आपल्याला माहीतच असेल, सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे. या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही. याची विविध कारणे असू शकतात. यातीलच महत्वाचे करणे आम्ही खाली देत आहोत. तसेच आपल्या अर्जाची स्थिती आपण फोन वरूनच बघू शकता ती लिंक सुद्धा आम्ही दिलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पहिले कारण
राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षांबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आहे. आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी.
महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेचे सिडींग कसे करायचे आणि स्टेट्स कसे पहायचे!
दुसरे कारण
बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे.बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
तिसरे कारण
तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, Review, Disapproved, असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात.
तसंच आपण खालील कारणांचा सुद्धा पडताळणी करणे आवश्यक आहे
- अपूर्ण माहिती: अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- अर्हता निकष पूर्ण न होणे: काही अर्जदार महिलांनी योजनेचे अर्हता निकष पूर्ण केले नसतील1.
- तांत्रिक अडचणी: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे काही अर्ज बाद होऊ शकतात.
- बँक खात्याशी संबंधित समस्या: काही महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा बँक खात्यात काही समस्या असतील.
Comments are closed.