लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात पटापट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Ladki Bahin Fast Payment Update  – लाडकी बहीण योजनेबाबात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मूहूर्त ठरला आहे. आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे. ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी वितरीत केला आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती, पण सरकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) राज्यात २ कोटी ४८ लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. आतापर्यंत जुलपर्यंतचे दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

Ladki Bahin June July 2024 Payment

 

मात्र, ऐन गणेशोत्सवात ऑगस्टचा हप्ता मिळेल, अशी आशा महिलांना होती. मात्र, असं काहीच झालं नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. दरम्यान, सप्टेंबर महिना सुरु होऊनदेखील १० दिवस झाले. त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare)यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करीत चालू आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये या योजनेसाठी एकूण ३९६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड