Ladki Bahin EKYC Update
लाडकी बहीण योजना: अपात्र महिलांना माफी, तर १४ हजार पुरुषांकडून वसुली होणार!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. या योजनेच्या पडताळणी दरम्यान सुमारे ८१ लाख महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या असल्या, तरी त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेल्या लाभाची कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही; त्यांना सरकारने एकवेळची माफी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या १४ हजार पुरुष लाभार्थ्यांवर कडक कारवाई करत, त्यांच्याकडून लाभाची संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे. ई-केवायसी (e-KYC) न केल्यामुळे किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक अपात्र सरकारी कर्मचारी आणि करदात्या महिलांचे मानधन थांबवण्यात आले असून, गरज पडल्यास पात्र वंचित महिलांसाठी पुन्हा एकदा ‘केवायसी विंडो’ सुरू करण्यात येईल असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Ladki Bahin EKYC Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे, ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खुशखभर आहे. मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. आता नवीन मुदतवाढ ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. माध्यमांशी संवाद साधताना आदिती तटकरे म्हणाल्या, e-KYC प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. नवीन निर्देशानुसार ही मुदत ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ आहे. अनेक पात्र महिलांची e-KYC प्रक्रिया OTP समस्येमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. नवीन मुदत मिळाल्याने कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी संबंधित बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे. e-KYC करताना आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आधार-लिंक मोबाइलवर OTP येतो. हा OTP टाकल्यानंतर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे OTP येत नाहीये आणि त्यामुळेच अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. आता मुदतवाढ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात ई-केवायसीमध्ये अडचणी झालेल्यांची यादी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. ही ई-केवायसी करताना काही कारणास्तव महिलांकडून चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळेहजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी, नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ४८० महिलांकडून ई-केवायसी करताना चुका झालेल्या आहेत. यामुळे या महिलांचे जानेवारी महिन्याचे पैसे आले नसल्याचे बोलले जात आहे. यासाठी https:// ladakibahin. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर जाऊन आधारकार्डचा क्रमांक टाकून प्रमाणिकरण करायचे आहे. संबंधित महिलेला पती किंवा वडिलांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर सरकारी नोकरी करीत नसल्याचे घोषणापत्रही भरून द्यावे लागणार आहे.
Ladki Bahin EKYC Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. दुसरीकडे पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थीची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पण निकषांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आता योजनेच्या निकषांनुसारच ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी ‘ई-केवायसी’च्या माध्यमातून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे आधारलिंक केले जात आहे. पुढे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ई-केवायसीसाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या मुदतीत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार आहे. १ एप्रिलनंतर ई-केवायसी न केलेल्यांचा लाभ बंद होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, अधिकृत आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थीनी अंतिम मुदतीबाबत अधिकृत पत्राची प्रतीक्षा करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना शासन निर्णयानुसार दरमहा १० तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या नोव्हेंबर संपला, आता डिसेंबरही संपत आला तरीदेखील लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे लाभ वितरीत करायला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेचा अडथळा आहे का, याबद्दल देखील आयोगाकडे विचारणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
दोन महिन्यांचा एकत्रित मिळू शकतो लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे ३५ टक्के लाभार्थी ई-केवायसी करायचे राहिले आहेत. ई-केवायसीसाठी आता दोन दिवसच मुदत राहिली असून लाभार्थींना त्यासाठी मुदतवाढ मिळेल. दुसरीकडे लाभार्थी महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ एकत्रितपणे वितरीत होऊ शकतो.
शासकीय योजनेच्या या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावे लागणार आहे. तरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी योजना सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेकदा वेगवेगळे बदल करण्यात येत असल्यामुळे तसेच प्रत्येक वेळी निकषा मध्ये बदल करण्यात येत असल्याने लाभार्थी महिला अडचणीत आल्या आहेत. सारख्या बदलत राहणाऱ्या निकषामुळे महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















