लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म मध्ये बदल कसा करायचा? – Edit फॉर्म कसा करायचा..
Ladki bahin edit form link
महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सध्या राज्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे हे आपल्या माहीतच असेल. शासनाकडून आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यांत १ कोटी ५९ लाख महिलांना तीन हजार रुपयांप्रमाणे ४ हजार ७८७ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. परंतु आतापण अद्यापही या योजनेसाठी नारीशक्ती माध्यमातून अर्ज केलेल्या जवळपास ४३ हजार महिलांना अर्जातील त्रुटीमुळे किंवा नारीशक्तीअँप अर्जामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एडिटचा पर्याय नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. परंतु आता या महिलांना हे रिजेक्ट अर्ज दुरुस्त करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार असून लवकरच नारीशक्ती अँप मध्ये फॉर्म एडिटचे बटण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे नामंजूर अर्जातील त्रुटी दुरुस्त करून त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होता येणार आहे. ज्या बहिणीचं अर्ज चुकांमुळे अडकलेले आहे त्याच्या आता आपले फॉर्म मध्ये आवश्यक ते बदल करून अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज लिंक सुरु – Ladakibahin.maharashtra.gov.in…
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शासनाच्या वतीने सुरुवातीच्या टप्प्यात नारीशक्ती अॅपद्वारे फॉर्म स्वीकारले जात होते. परंतु या अॅपवरील वाढता ताण पाहता शासनाने नवीन पोर्टलची निर्मिती करून त्या माध्यमातून हे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली होती. परंतु सुरुवातीच्या काळात नारीशक्ती अॅपवरून भरलेले फॉर्म काही चुकांमुळे रिजेक्ट झाल्यानंतर तो फॉर्म पुन्हा दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे काही कारणांमुळे अर्ज रिजेक्ट ठरल्यामुळे राज्यातील जवळपास ४३ हजार अर्ज लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहण्याचा अंदाज होता. याचा विचार करून अखेर महिला आणि बालकल्याण विभागाकडून या अर्जदारांसाठी एडिट बटनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अॅपमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या एडिट बटनमुळे लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या अर्जात आवश्यक बदल करता येणार आहेत. त्यामुळे यापूर्वी नामंजूर झालेल्या अर्जदारांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरता येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने अर्थसंकल्पादरम्यान या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली असून सध्या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या २१ते ६५ वयोगटातील महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थीना लाभ देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
Comments are closed.