लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या हफ्त्याची तारीख झाली जाहीर, यादीत नाव पहा – Ladki Bahin dusra Hafta Date status
Ladki Bahin dusra Hafta Date status
आताच प्राप्त नवीन माहिती नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करुन ई – केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शासन मार्फ केले आहे.
तसेच, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाच्या दुसऱ्या टप्प्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या ३१ ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे थेट जमा होणार आहेत. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये रेशीमबाग येथे होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या योजना लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या आधार कार्डाची बँक खात्याशी सीडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच, दुसऱ्या टप्प्यातील 4500 रुपये मिळतील. आधार सीडिंग न केल्यास, योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी सीड झाले असेल आणि अन्य अटींमध्ये आपला फॉर्म पास झाला, तर तुम्ही 4500 रुपये मिळवण्यास पात्र आहात.
Comments are closed.