लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! एप्रिल महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार |Ladki Bahin April Payment Date OUT
Ladki Bahin April Payment Date OUT
महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र, एप्रिल महिना संपत आला तरीही अजून अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे हजारो लाभार्थी बहिणी सध्या प्रतीक्षेत आहेत.
यावर आता समाधानकारक अपडेट समोर आले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या लाभार्थी अर्जांची पडताळणी सुरू असून, शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जात आहे. उदाहरणार्थ, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत ९ लाख अपात्र महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जांची पडताळणी वेगाने सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे रहिवासी नसलेले तसेच सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या महिलांनाही योजनेमधून वगळण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लाडक्या बहिणींना लवकरच योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
आज सरकार द्वारे राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आणली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल २०२५ महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार (Ladki Bahin April Payment Date OUT ) असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात दहावा हप्ता जमा होईल,” आणि योजनेच्या बंद होण्याबाबत अफवांना पूर्णविराम दिला आहे. चला तर जाणून घेऊया या बद्दल पूर्ण तपशीलवार माहिती.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात महिलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये थेट जमा केले जातात. परंतु मागील काही दिवसांत या योजनेच्या भविष्याबाबत अनेक विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर, छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, “शासनाचे पैसे कुठेही जाणार नाहीत, ते निश्चितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील.” त्यांनी सांगितले की काही वेळा आर्थिक प्रक्रियेतील विलंबामुळे थोडासा उशीर होतो, मात्र योजनेच्या बंद होण्याची भीती निराधार आहे.
भुजबळ यांनी ही तुलना घरगुती खर्चाशी केली. “आपली कमाई ठरलेली असते. एखाद्या महिन्यात मोठा खर्च झाला, तर इतर खर्च थोडे मागे पडतात. पण त्याचा अर्थ असा नाही की, सगळंच थांबेल,” असं उदाहरण देत त्यांनी राज्य सरकारचा खर्च कसा कार्यान्वित होतो हे समजावून सांगितलं. एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी अनेक महिलांनी बँक खात्याची स्थिती तपासण्यास सुरुवात केली होती. अनेकजणी सोशल मीडियावर यासंबंधी प्रश्न उपस्थित करत होत्या. यावर अखेर मंत्री भुजबळ यांनी अधिकृतपणे उत्तर दिलं आणि “हप्ता येणारच आहे, आणि तोही अक्षय तृतीयेला,” अशी खात्री दिली.
याच कार्यक्रमात भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकांचं नुकसान झालं आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे आणि पंचनामे सुरू झाले आहेत. सरकार शेतकऱ्यांना नक्कीच मदत करेल.” थोडक्यात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात अक्षय तृतीयेला जमा होईल, हे आता स्पष्ट झालं आहे. महिलांनी घाबरून न जाता थोडी प्रतीक्षा करावी, कारण शासन आपली जबाबदारी पार पाडणारच आहे.