महायुतीला कडून लाडक्या बहिणीनां खुशखबर, जाणून घ्या हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर..

Ladki Bahin After Mahayuti Wins

Ladki Bahin After Mahayuti Wins – एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹1500 चा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली, तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा कल मिळाला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहणीचे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारल्या जात आहे. ‘लाडकी बहीण’ योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्त्रोत ठरणार आहे, हे दाखविण्याचे आव्हान आता शिंदे सरकारपुढे आहे.

 

Ladki Bahin After Mahayuti Wins

निवडणूक डावपेचांमध्ये योजनेची भूमिका

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप केला होता. तसेच, ही योजना फार काळ चालणार नाही, असे भाकीत देखील केले गेले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

आता, लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते.

हप्ता कधी मिळणार? शिंदे यांचे आश्वासन

प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते, “ही योजना फक्त घोषणांसाठी नाही. आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल. याशिवाय, पुढील कालावधीसाठीही पुरेसे नियोजन केले आहे.”

शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “आम्ही फक्त ₹1500 देणार नाही, तर योजनेचा लाभ वाढवून ₹2100 करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले होते. कोल्हापूरमधील जाहीर सभेत मोठ्या घोषणा

महायुतीच्या प्रचारसभेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी १० मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेत दर महिन्याचा हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्यात येणार.

महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी २५,००० महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येईल. महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल.” राजकीय वर्तुळात टीकेच्या झळा सहन करतही महायुती सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केल्या आहेत. महिला मतदारांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नसून तिचा फायदा आगामी काळातही मिळत राहील, अशी अपेक्षा महिलांमध्ये आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Prajyot Dilip Mahalle says

    Police bharti December 2024 kevha night….?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड