बारामती येथी एका सोहळ्यात अट सुवर्ण यांनी एक महत्वाचे माहिती दिली, हि माहिती भू चर्चित लाडकी बहीण योजने बद्दलची आहे. लाडक्या बहिणींना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या कर्जाचे हप्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वळते केले जाऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बारामतीतील मुढाळे येथील विद्याुत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. चाल तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे. मात्र, गोरगरीब महिलांना पैसे मिळत असल्याने त्यांना उपयोग होत आहे. दोन कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आता महिलांना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्याचे हप्ते हे या योजनेतून वळते केले जातील,’ असे अजित पवार म्हणाले.
‘महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे. या योजनेतून सुमारे आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत. या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा संच दिले आहेत. या योजनेसाठी १ हजार कोटींपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















