आपल्याला माहीतच असेल, सध्या मागील गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलाना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. हि सर्व बहिणीसाठी या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?
आताच प्राप्त नवीन अपडेट माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आता मात्र सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिलेली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत. तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आधार बँक खात्याला लिंक असणे गरजेचे
दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असूनदेखील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















