लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार, या तारखेला बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता!

Ladki Bahin 3rd Installment Date

आपल्याला माहीतच असेल, सध्या मागील गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलाना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. हि सर्व बहिणीसाठी या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Ladki Bahin 3rd Installment Date

29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आताच प्राप्त नवीन अपडेट माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आता मात्र सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिलेली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत. तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार बँक खात्याला लिंक असणे गरजेचे

दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असूनदेखील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Joshi supriya uday says

    ठाणे जिल्हा डोंबिवली mmlby फॉर्म approve,aadhar no. Link bank but nt CMG money

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड