ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर जाणून घेऊयात महत्वाचा नवीन अपडेट!

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती आणि आतापर्यंत ९ हप्ते जमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांनी या रकमेचा वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यांनी वचन दिलं होतं की १५०० रुपयां ऐवजी २१०० रुपये देण्यात येतील.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सध्या लाभार्थींना १५०० रुपयेच मिळत आहेत. २१०० रुपये कधीपासून मिळतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या ही रक्कम वाढवण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर २१०० रुपये दिले जातील.
परिणय फुके यांचं मोठं वक्तव्य!
भाजप नेते परिणय फुके यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की,
“लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केवळ २१०० नव्हे, तर ३००० रुपये सुद्धा देता येतील, पण थोडा वेळ वाट पाहावी लागेल. आम्हाला महिलांचा विश्वास आहे, त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं आहे आणि आम्ही त्याची परतफेड करू. सुरुवातीला १५०० रुपये सुरूच राहतील, परिस्थिती सुधारली की २१०० रुपये आणि नंतर ३००० रुपये देण्यात येतील.”
महिलांना वाढीव रक्कम कधी मिळणार?
राज्य सरकारकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, परिणय फुके यांच्या वक्तव्यामुळे महिलांना लवकरच वाढीव मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















