प्रयोगशाळा सहाय्यकांना कालबद्ध पदोन्नतीचे एस-८ वेतन लागू!- Laboratory Assistant Salary Update
Laboratory Assistant Salary Update
कालबद्ध पदोन्नतीस पात्र ठरलेल्या प्रयोगशाळा सहाय्यकांना एस-८ वेतन श्रेणी लागू करण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप शिक्षक आघाडीच्या लढ्याला यश आले आहे. प्रयोगशाळा सहाय्यकांना एस-८ वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती व्हावी याकरिता शिक्षक आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अनिल महादेवराव शिवणकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिले होते. तेव्हापासून संघटनेतर्फे शासनासोबत सतत पाठपुरावा सुरू होता. पहिल्यांदा शिक्षण संचालनालयातर्फे शासनास एस-८ वेतनश्रेणीबाबत निर्णय घेण्याची शिफारस २७ फेब्रुवारी २०२४ व १७ जुलै २०२४ रोजी करण्यात आली होती.
राज्यातील काही जिल्ह्यात एस-८ नुसार २०१९ मध्येच प्रयोगशाळा सहाय्यकांची कालबद्ध वेतन निश्चिती झालेली होती परंतु इतर जिल्ह्यांत ती झालेली नव्हती. त्यामुळे प्रयोगशाळा सहाय्यकांच्या कालबद्ध वेतनश्रेणीत राज्यात एकवाक्यता दिसून येत नव्हती. या गंभीर विषयाबद्दल शिवणकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातील सर्व प्रयोगशाळा सहाय्यकांना कालबद्ध पदोन्नतीची एस-८ वेतनश्रेणी लागू करण्याचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो प्रयोगशाळा सहाय्यकांना याचा लाभ होणार आहे. या लढ्यात भरत जगताप, गुणवंत आत्राम, प्रमोद भैसारे, ज्ञानेश्वर उमरे, उफ्रान्सिस जोसेफ, भास्कर कायते, सुरेश वंजारी, लक्ष्मण शिंदे, मनोज वैद्य व इतरही प्रयोगशाळा सहाय्यकांचा सक्रिय सहभाग होता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App