कृषी आयुक्तालयातील ५८ टक्के पदे रिक्त; १० हजार जागा भरल्याच नाहीत! । Krushi Vibhag Bharti 2024
Krushi Vibhag Offline Application 2024
Krushi Vibhag Bharti 2024
देशभरातील महाराष्ट्र हे राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. शेतमाल निर्यात, उसाचे उत्पादन, कांद्याचे उत्पादन, इतर शेतमालाच्या आणि फळांच्या उत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्र हा कायम पुढेच राहिलाय पण धक्कादायक बाब अशी की मागच्या कित्येक दिवसांपासून राज्याच्या या साम्राज्याला ‘शिलेदार’च कमी आहेत. कृषी आयुक्तालयातील ५८ टक्के तर राज्यातील कृषी विभागातील ३६ टक्के जागा रिक्त आहेत. कृषी विभागातून मिळालेल्या १ सप्टेंबरपर्यंतच्या माहितीनुसार, कृषी आयुक्तालयातील मंजूर असलेल्या ८३१ पदांपैकी केवळ ३५२ पदे भरली असून ४७९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची ही टक्केवारी ५८ टक्के एवढी आहे. यामध्ये गट-अ मधील मंजूर ५७ जागांपैकी ३५ जागा भरलेल्या असून २२ जागा रिक्त आहेत. गट ब च्या ११४ जागापैकी ७८ जागा भरलेल्या असून ३६ जागा रिक्त आहेत. गट क मधील ५३६ जागांपैकी २११ जागा भरलेल्या असून ३२५ जागा रिक्त आहेत. तर ड गटामधील १२४ जागांपैकी २८ जागा भरलेल्या असून ९६ जागा रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरम्यान, राज्यभरातील कृषी विभागाच्या सर्वच पदाचा विचार केला तर आयुक्तांपासून ड वर्गापर्यंत एकूण ३६ पदे आहेत. राज्यभरातील कृषी विभागात काम करण्यासाठी एकूण २७ हजार ५०२ पदे मंजूर आहेत. पण त्यातील केवळ १७ हजार ५०० जागा भरलेल्या असून १० हजार २ जागा रिक्त आहेत. एकूण पदांपैकी रिक्त जागांची टक्केवारी ही ३६ टक्के एवढी आहे.
रिक्त जागांमुळे अतिरिक्त परभार अधिकाऱ्यांना देण्यात येतो. या कामाचा अतिरिक्त ताण अधिकाऱ्यांवर पडल्यामुळे कामांची गती मंदावते. राज्याचे कृषी क्षेत्र देशावर प्रभाव टाकत असले तरीही कृषी विभागाची ही स्थिती आहे. राज्य सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर प्रलंबित पीक विमा, अनुदानाची रक्कम, योजनेची उर्वरित रक्कम तातडीने मंजूर करण्यात आली. पण रिक्त पदांमुळे राज्य सरकारने शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय.
The High Court has rejected the petitions filed regarding the recruitment of officials in the state’s agriculture department. Therefore, the movement has started to recruit 417 candidates recommended by the Maharashtra Public Service Commission. Sources in the Commissionerate of Agriculture said that petitions regarding recruitment had gone to court. But, now the obstacles in the court’s role have been removed. The final process of recruitment can be done as soon as the court verdict is handed down and proper instructions are received from the state government.
Krushi Vibhag Bharti 2024: राज्याच्या कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात दाखल झालेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ४१७ उमेदवारांची भरती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की भरतीसंदर्भात अडचणीच्या ठरणाऱ्या याचिका न्यायालयात गेल्या होत्या. परंतु, आता न्यायालयाच्या भूमिकेतील अडथळे दूर झाले आहे. न्यायालयाचे निकाल हाती येताच तसेच राज्य शासनाकडून योग्य सूचना प्राप्त होताच भरतीची अंतिम प्रक्रिया पार पडू शकते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ४१७ उमेदवारांची निवड कृषी अधिकाऱ्यांच्या विविध संवर्गासाठी केली होती. परंतु, रखडलेल्या भरतीचा तिढा सुटण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचेही प्रयत्न सुरू होते.
भरतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्याच्या कृषी विभागात उपसंचालक (गट अ), तालुका कृषी अधिकारी (गट ब) व मंडळ कृषी अधिकारी (गट ब कनिष्ठ) या पदांवर नवे अधिकारी नियुक्त होतील. भरतीची प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडल्यामुळे उमेदवार हैराण झाले होते. काही जणांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये सेवा स्वीकारली. ही समस्या कृषिमंत्र्यांच्या कानावर जाताच त्यांनी न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी प्रयत्न केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील २५८ जागांसंदर्भातील परीक्षेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतील एमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे पत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे. त्यामुळे एमपीएससीमार्फत कृषी विभागातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या परीक्षेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याने २० ऑक्टोबर २०२२चे परिपत्रक राज्य शासनाकडून रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलल्यानंतर कृषी विभागाच्या २५८ जागा यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑक्टोबर २०२२चे ते परिपत्रक आता रद्द करण्यात आले आहे. हे परिपत्रक रद्द केल्यानंतर आता कृषी विभागाच्या २५८ जागांसंदर्भात लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही पुढे आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. त्याशिवाय कृषी विभागातील २५८ जागांचा सुद्धा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारची जाहिरात लवकर जारी केली जाईल, असेही यात म्हटले आहे. नुकतेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर २५ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्याचबरोबर कृषी विभागाच्या २५८ जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले.
बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र संयुक्त पूर्व परीक्षेच्या ‘गट ब आणि गट क’च्या पंधरा हजार जागा भरण्याची तिसरी मागणीदेखील विद्याथ्यर्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार, रुपाली पाटील आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातून पंधरा हजार जागा भरण्याच्या तिसऱ्या मागणीबाबत येत्या सात दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील, असे आश्वासन रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना दिले होते. त्याचबरोबर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनीदेखील विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि या तिसऱ्या मागणीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार, अभिमन्यू पवार यांचे प्रतिनिधी आणि रुपाली पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जोपर्यंत तिसऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतला होता.
मित्रांनो, कृषी विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आला आहे. कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी ‘गट अ’ आणि ‘गट ब’मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १०१८ पदांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करावा, अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उमेदवारांकडून देण्यात आला आहे. अरविंद कायंदे, संग्राम नरळे, आकाश माने, रोहिणी भाकरे, श्रेया नांगरे, विराज दंडवते, प्रवीण पाटील आदींनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विभागात एक हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार असूनही एक व्यक्ती दोन-तीन पदांची जबाबदारी सांभाळत आहे. २०२१च्या २०३ आणि २०२२च्या २१४ जागांसाठी झालेल्या भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. कृषी विभागाने २५८ जागांचे मागणीपत्र ‘एमपीएससी’ला देऊनही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. या २५८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करून त्यांचा समावेश २५ ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोनदा मागण्या मांडल्या असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, कार्यवाही झालेली नाही. सरकारने तातडीने कृषी विभागातील हक्काच्या जागा एमपीएससीद्वारे न भरल्यास अनेक उमेदवारांचे वय उलटण्याची भीती आहे. अनेकांचे पुढील आयुष्य, विवाह त्यावर अवलंबून आहेत,’ याकडे या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. राज्यात किमान दीड लाख उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. ते व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे दहा लाख मतदार वेळप्रसंगी मतदानाद्वारे आपली ताकद दाखवून देतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
Krushi Vibhag Bharti 2024: Krushi Vibhag has been recently published new recruitment notification of vacant Posts. The name of this recruitment is “Managing Director”. There is a 01 vacant post available. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 08 Days (01st of August 2024). For more details about Krushi Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कृषी विभाग अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – कृषि संचालक, आत्मा कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 दिवस (01 ऑगस्ट 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/
Krushi Vibhag Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापकीय संचालक | 01 |
How To Apply For Krushi Vibhag Recruitment 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For krishi.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/gmACU |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://krishi.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
Nothing
Details pls
Lipik sathi qualification???
क्रुषी फाँरम ची तारीख काय आहे आणि वय शिक्षण किती पाहिजे
Krushi vibhagat bharti sathi Kuthe application karayach aahe aani Kiti qualification pahije