कोयना धरण प्रकल्पात २८९ पैकी १५७ पदे रिक्त, नवीन पदभरती लवकरच अपेक्षित! – Koyna Prakalp Recruitment
महाराष्ट्राची वरदायिनी व तीन राज्यांच्या सिंचनाची महत्त्वपूर्ण गरज भागवणाऱ्या कोयना प्रकल्पात बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे रिक्त पदे आहेत. २८९ जागांपैकी तब्बल १५७ पदे रिक्त आहेत कोयना प्रकल्पात एकूण २८९ मंजूर पदांपैकी केवळ १३२ पदे कार्यरत असून साठ टक्के रिक्त पदे आहेत. यामध्ये वर्ग एक साठी मंजूर बारा पदांपैकी सात रिक्त पदे असून यात उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय, सहाय्यक अभियंता, वैद्यकीय अधिकारी अशी महत्त्वपूर्ण पदांचा समावेश आहे. वर्ग दोनमध्ये ३८ पैकी २७ पदे रिक्त आहेत. वर्ग तीन मधील लिपिक, लेखापाल, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियंता, सहाय्यक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ वैज्ञानिक, सहाय्यक, संशोधक सहाय्यक, मिश्रक, सहाय्यक भांडारपाल, अशी १७३ मंजूर पैकी ९५ पदे रिक्त आहेत.