कोल्हापूर महानगरपालिका पदभरतीचा मार्ग मोकळा, नवीन भरती प्रक्रिया लवकरच!!! | Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2026

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

कोल्हापूर मधील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या कोल्हापुरात लवकरच नोकरीची संधी मिळणार आहे. प्राप्त माहिती नुसार, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरण नियमावलीच्या प्रस्तावाला अखेर राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी अधिकाऱ्यांच्या जिवावर चालणाऱ्या महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात या निर्णयामुळे मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे महापालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांना वेळेत पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, तसेच विविध विभागांमधील रिक्त पदांवर आता पूर्णवेळ आणि पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे शक्य होणार आहे. मात्र, महापालिकेत नवी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवताना तसेच रिक्त पदे पदोन्नतीने भरताना प्रत्येक वेळी राज्य शासनाची स्वतंत्र आणि पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमावलीचा अध्यादेश गुरुवारी महापालिका प्रशासनाला अधिकृतपणे प्राप्त झाला असून, यामुळे कोल्हापूर पालिकेच्या आस्थापनेवरील प्रशासकीय सुधारणांना एक नवी गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नव्या नियमावलीनुसार पदोन्नतीने करावयाची कोणतीही नियुक्ती ही केवळ कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता, त्यांची सेवाविषयक पात्रता आणि विशिष्ट अर्हता या निकषांच्या आधारेच केली जाणार आहे. महापालिकेतील वर्ग-१ ची तसेच इतर सर्व स्तरांतील पदे पदोन्नतीने भरताना महासभेची मंजुरी घेणे आणि त्यानंतर राज्य सरकारची अंतिम पूर्वमान्यता मिळवणे अनिवार्य असणार आहे. सध्या महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्त पदे मंजूर असून, त्यापैकी एक पद राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर तर दुसरे पद महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने भरले जाणार आहे. याच धर्तीवर एकूण पाच उपायुक्तांपैकी तीन पदे राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीवर, तर उरलेली दोन पदे महापालिका प्रशासनामधून पदोन्नतीने भरण्यात येतील. तसेच महापालिकेतील १० सहाय्यक आयुक्तांच्या पदांपैकी ७ पदे ही प्रतिनियुक्तीवर आणि उर्वरित ३ पदे अंतर्गत पदोन्नतीद्वारे भरण्याचा स्पष्ट आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय रचना व कार्यपद्धती विभाग, कामगार अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, कर संग्राहक, मालमत्ता अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल आणि नाट्यगृह अधिकारी यांसारखी अनेक महत्त्वाची प्रशासकीय पदे पदोन्नती नियमांनुसार टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत.

सरळ सेवा भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ व्हावी यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष भरती समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या उच्चस्तरीय समितीमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक, संबंधित विभागाचे प्रमुख, मागासवर्गीय प्रवर्गातील प्रतिनिधी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. या विशेष समितीच्या देखरेखीखालीच भविष्यातील सरळ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाईल. सध्या कोल्हापूर महापालिकेच्या आस्थापनेवर विविध १९९ संवर्गातील एकूण ४,४४५ पदे मंजूर आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नागरी सेवा पुरवताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या नव्या सेवा प्रवेश नियमावलीच्या अंमलबजावणीमुळे तातडीने १९२ कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून महापालिकेच्या कामकाजात अधिक शिस्त, पारदर्शकता आणि तत्परता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 : Kolhapur Municipal Corporation has invited applications from Retired Officer for the posts of “Radiologist”. There are 02 vacant post is available. The job location for this recruitment is Kolhapur. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on Every Monday between 11:00 AM and 2:00 PM. For more details about Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026, our website www.MahaBharti.in.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत “रेडिओलॉजिस्ट” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२६ करीता मुलाखती दर सोमवारी सकाळी ११.०० ते ०२ वा. या वेळेत घेणेत येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२६

  • पदाचे नावरेडिओलॉजिस्ट
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – आर. सी. एच. कार्यालय, श्री पंचगंगा रुग्णालय
  • मुलाखतीची तारीख – दर सोमवारी सकाळी ११.०० ते ०२ वा. या वेळेत
  • अधिकृत वेबसाईट – https://web.kolhapurcorporation.gov.in/

Kolhapur Municipal Corporation Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
रेडिओलॉजिस्ट01

Eligibility For Kolhapur Municipal Corporation 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रेडिओलॉजिस्टएम.डी. रेडिओलॉजी पदव्युत्तर पदवी आवश्यक किंवा डी.एम.आर.डी. पदव्यूत्तर पदविका आवश्यक

Selection Process For Kolhapur Municipal Corporation Recruitment 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती दर सोमवारी सकाळी ११.०० ते ०२ वा. या वेळेत घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For web.kolhapurcorporation.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/Ce1FH
✅ अधिकृत वेबसाईट
https://web.kolhapurcorporation.gov.in/


Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 : Kolhapur Municipal Corporation has invited applications from Retired Officer for the posts of “Radiologist”. There are 02 vacant post is available. The job location for this recruitment is Kolhapur. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address or apply through e-mail before the last date. The last date of Application is 22nd of June 2026. For more details about Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026, our website www.MahaBharti.in.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत “रेडिओलॉजिस्ट” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२६

  • पदाचे नाव –  रेडिओलॉजिस्ट
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे 
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर 
  • अर्ज पद्धतीऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता –labourofficerkmc@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत ब्युरो व नोंदणी विभाग, कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://web.kolhapurcorporation.gov.in/

Kolhapur Municipal Corporation Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
रेडिओलॉजिस्ट02

Eligibility For Kolhapur Municipal Corporation 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रेडिओलॉजिस्ट

How To Apply Kolhapur Municipal Corporation Recruitment 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2026 आहे.
  • अर्ज सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत (कार्यालयीन सुट्टीचा दिवस वगळून) करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For web.kolhapurcorporation.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/Btigs
✅ अधिकृत वेबसाईट
https://web.kolhapurcorporation.gov.in/

Table of Contents

1 thought on “कोल्हापूर महानगरपालिका पदभरतीचा मार्ग मोकळा, नवीन भरती प्रक्रिया लवकरच!!! | Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड