बाल विकास विभागातर्फे एक आनंदाची बातमी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती प्रक्रिया पुणे जिल्ह्यात सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे(Khed Anganwadi Recruitment 2025). खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय खेड १ आणि खेड २ यांच्या अंतर्गत एकूण ६१ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या २६ आणि मदतनीस पदांच्या ३५ रिक्त जागांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी स्थानिक महिलांना विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विशाल शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आणि सारिका देशमुख यांनी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी असून, इच्छुक महिलांनी कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. चला तर जाणून घेऊया या भरती बद्दल पुणे माहिती आणि अर्ज प्रकिया कशी आहे..

बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांच्या माहितीनुसार, खेड प्रकल्प क्रमांक १ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या १३ तर मदतनीस पदांच्या २३ जागा रिक्त आहेत. तर प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांच्या माहितीनुसार, खेड प्रकल्प क्रमांक २ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या १३ आणि मदतनीस पदांच्या १२ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.
खेड क्रमांक १ अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या जागा पुढील गावांमध्ये उपलब्ध आहेत: ठाकरवाडी (कान्हेवाडी बु.), बारापाटी (कमान), शिरोली, लादवड, ठाकरवाडी (वडगाव पाटोळे), सातकरस्थळ पूर्व, ढोरेभांबुरवाडी, जैदवाडी, गोसासी, सडकवस्ती (कनेरसर), तांबेवाडी (वरुडे), खरपुडी बु., आणि ठाकरवाडी (जऊळुके खु.). तसेच, मदतनीस पदांसाठी गुंडाळवाडी, सहाणेवाडी (कान्हेवाडी बु.), कारकुडी, जावळेवाडी (मंदोशी), नायफड, धारेवाडी (खरोशी), वांजळे, भिवेगाव, एकलहरे, वडगाव पाटोळे, वाकी बु., रानमळा, कडलगवाडी, परसुल, वाजवणे, कुडे खू., घाटवस्ती (सांडभोर वाडी), चांडोली क्र. १, कातकरीवस्ती (चांडोली), ठाकरवाडी (निमगाव), ठाकरवाडी (वाडा), सुरकुंडी आणि वाफगाव क्र. १ या ठिकाणी रिक्त जागा आहेत.
खेड क्रमांक २ अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या जागा धामणे, कोरेगाव बु., सुपे, सावंजवाडी (आडगाव), कमलजाई (च-होली), बोरदरा, चिंचोशी, ठाकरवाडी (म्हाळुंगे), बापदेवस्ती (कडाचीवाडी), कोळीये, कातकरवाडी (शिवे), आणि आंबेठाण अंगणवाडी नं. १ या गावांमध्ये भरल्या जाणार आहेत. तसेच मदतनीस पदांसाठी आडगाव, भलवडी, विर्हाम, वाघु, तांबडेवाडी (वांद्रा), नाणेकरवाडी, विश्रांतवड (च-होली), खराबवाडी नं. २, विठ्ठलनगर (सांगुर्डी), कोळीये, वाकी तर्फे वाडा आणि आंबेठाण नं. २ या गावांमध्ये रिक्त पदांची भरती होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे. अंगणवाडी सेविका पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच, उमेदवारांना दोन अपत्य मर्यादा ही अट लागू असेल. अर्जाची नमुने ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ५ फेब्रुवारीपासून उपलब्ध असून, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह भरलेले अर्ज १८ फेब्रुवारीच्या आत खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत. या संदर्भात विस्तार अधिकारी अमित लोंढे आणि बापू बागंर यांनी अधिक माहिती दिली आहे.
ही भरती प्रक्रिया खेड तालुक्यातील स्थानिक महिलांसाठी एक उत्तम संधी असून, इच्छुक आणि पात्र महिलांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















