खामगाव आयटीआयमध्ये महिला रोजगार मेळावा आयोजित, अर्ज करा.! – Khamgaon ITI Rojgar melava

Khamgaon ITI Rojgar melava

खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 28 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करियर सेंटर बुलडाणा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खामगाव आयटीआयमध्ये करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सदर ‍महिला रोजगार मेळाव्यात हिंदुस्थान युनीलीव्हर लिमिटेड, खामगाव या उद्योजकांनी त्यांच्याकडील आयटीआय इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंटेशन, ‍फिटर या पदांसाठी फक्त महिलांसाठी 15पेक्षा अधिक पदे अधिसुचित केली आहेत. तसेच एलआयसी इंडियाच्या विमा अभिकर्ता पदासाठी देखील 20 पदे अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक ‍महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर महिला उमेदवारांनी दि. 28 जून 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलंब रोड, खामगाव, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे आणि रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन घ्यावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पात्र, गरजू व नौकरी इच्छुक महिला उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीताही अर्ज करु शकतात. तरी इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा 07262-242342 दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड