Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इस्रायलमध्ये कामगारांची भरती सुरु, त्वरित करा अर्ज, दरमहा मिळणार दीड लाख पगार – Kaushalya Vikas Vibhag Bharti 2024

Kaushalya Vikas Vibhag Bharti 2024

Kaushalya Vikas Vibhag Bharti 2024 -The Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation has begun the process of inviting applications from skilled construction workers for employment opportunities in Israel. Minister for Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Mangal Prabhat Lodha said the government will do everything possible to ensure that work is provided in a safe environment and in a good environment in the construction sector in Israel. Minister Shri Lodha said that construction workers are getting an opportunity to work in Israel in collaboration with The National Skill Development (NSDC) International of the Central Government and the State Government. These construction workers will be guided by the government as best possible. Interested people should contact the District Skills, Employment Entrepreneurship Guidance Center at the district level.

बांधकाम कामगारांना इस्त्राईलमध्ये नोकरी करण्याची संधी. धाराशिव जिल्हयामधील कुशल बांधकाम कामगारांना इस्त्राईल मध्ये नोकरीच्या संधीसाठी अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य रोजगार उद्योजकता, नाविन्यता विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडुन सुरु झालेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (NSDC) व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारासाठी इस्त्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडुन सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. गावस्तरावर ग्रामसेवक तथा तालुकास्तरावर गटविकास अधिकारी पंचायत समिती तथा जिल्हास्तरावर बांधकाम विभाग जिल्हा परिषद धाराशिव येथे संपर्क साधावा असे आवाहन मा. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 

फ्रेमवर्क शटरिंग कारपेंटर, बारबेंडीग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन या क्षेत्रातील कुशल कामगार तथा गवंडी इत्यादि जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. निवडलेल्या व्यक्तीना इस्त्राईलमध्ये इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या नोकरीमुळे निवडलेल्या कामगारांना १.५० लक्ष ते २.०० लक्ष पर्यंत दरमहा वेतन मिळेल. या पदासाठी २१ ते ४५ या वर्ष वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करुन शकतात. कामगाराला किमान ०१ वर्ष ते कमाल ०५ वर्षर्षाच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. इच्छुक उमेदवाराना कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी गावस्तरावर ग्रामसेवक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी पचायत समिती ब जिल्हास्तरावर बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांचेशी संपर्क साधावा.

 

पूर्ण माहिती PDF पहा

 


इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धानंतर इस्रायलने मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींचे कामाचे परवाने रद्द केले आहेत. त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. इस्रायलचा बांधकाम उद्योगासह अन्य इतर उद्योग बंद पडले आहेत. येथे कामगारांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी इस्रायल भारतासह इतर देशांतील कामगारांच्या शोधात आहे. ही भरती बार बेंडर, मेसन, टिलर, स्टटरिंग कारपेंटर यासारख्या नोकऱ्यांसाठी आहे. भारती करण्यात येणाऱ्या लोकांना वैद्यकीय विमा, भोजन आणि निवास यासह एकूण 1.37 लाख रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. तसेच या कामगारांना दरमहा 16 हजार 515 रुपये बोनसही दिला जाणार आहे.

युद्धग्रस्त इस्रायलसाठी भारतामध्ये कुशल कामगारांची प्रचंड भरती सुरू आहे. या भरतीसाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यानंतर आता आणखी पाच राज्ये पुढे आली आहेत. त्यांनीही या भरती मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती मोहिमेसाठी 15 सदस्यीय इस्रायलची टीम भारतात आली आहे. ही टीम अनेक राज्यांमध्ये बांधकाम कामगारांची भरती करत आहे.

हरियाणा राज्यात 16 ते 20 जानेवारी दरम्यान ही भारती मोहीम आयोजित करण्यात आली होती. हरियाणामधील 1,370 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी 530 उमेदवारांची निवड झाली होती. उत्तर प्रदेशमध्ये ही भरती प्रक्रिया मंगळवारी संपली. येथील 7182 उमेदवारांपैकी एकूण 5087 जणांची निवड करण्यात आली.

इस्रायलसाठी भरतीसाठी या दोन राज्यांनी आधी पुढाकार घेतला. त्यानंतर आता मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल (NSDCI) ला मंगळवारी ही भरती मोहीम राबविण्याची विनंती केली आहे. इस्रायलच्या या भरतीसाठी यापूर्वी 31 जानेवारी 2024 ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती.

इस्रायलमधील बांधकाम कामगारांना रोजगार देण्याची प्रक्रिया भारताचे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, NSDC इंटरनॅशनल, लोकसंख्या, इमिग्रेशन, बॉर्डर अथॉरिटी (PIBA) आणि इस्रायल अंतर्गत काम करणारी एजन्सीद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी भारताला कुशल मनुष्यबळाचे जागतिक केंद्र बनवण्याचे आहे. ही भरती प्रक्रिया त्या दिशेने एक पाऊल आहे. विकसित भारताच्या उभारणीच्या एकूण दृष्टिकोनाचा हा एक भाग आहे. केवळ इस्रायलच नाही तर इतर अनेक देशांना कुशल संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी भारत तयार आहे.

इस्रायलमध्ये ५ हजार कामगारांनी किमान पाच वर्षे काम केल्यास भारताला ५ हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. हे कामगार तिथे काम करून जवळपास ५ हजार कोटी रुपये त्यांच्या देशात भारतात पाठवतील असा याचा आर्त आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

 


 

इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्री श्री.लोढा म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (NSDC) इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.

फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16,000 रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल.

या पदासाठी साठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.

अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी


Efforts are currently being made by the central government to provide employment opportunities. The Ministry of Education and Skill Development and Entrepreneurship of the Union Government in collaboration with NSDC, AICTE and Bajaj Finserv signed two MoUs. Under this agreement, students from many small and big cities of Maharashtra will be given this training. Young graduates will be prepared under the Banking, Finance and Insurance Certificate Program for employment opportunities in the financial services sector under Kaushalya Vikas Vibhag Bharti 2024. The partnership will create capacity building in the financial sector and prepare young people in a strong way to participate in the changes in digital media in the financial sector. “Our partnership with NSDC and the Ministry of Education will help us transform the younger generation, for which they will also have the best skills and countless doors to success,” Bajaj said in a statement. This will provide opportunities for integrated work with economic development in the future and make the phrase Skill India, Skill India true.

 

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारांतर्गत महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आर्थिक सेवा क्षेत्रामधील रोजगार संधींकरिता तरुण पदवीधर मुलं बँकिंग, फायनान्स आणि इन्श्युरन्स सर्टिफिकेट प्रोग्राम अंतर्गत तयार होतील. या भागीदारीमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये क्षमता निर्मितीसह तरुणांना आर्थिक क्षेत्रातील डिजिटल माध्यमांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये सहभागी होण्याकरिता भक्कम पद्धतीने तयार केले जाणार आहे. याबाबत बजाजचे संजीव बजाज म्हणाले की, आमची एनएसडीसी आणि शिक्षण मंत्रालयाशी झालेली भागीदारी ही आम्हाला तरुण वर्गामध्ये बदल घडवून आणण्यात मदत करेल, ज्याकरिता त्यांना उत्तम कौशल्यासह अगणित असे यशाचे दरवाजे देखील खुले होतील. यामुळे आर्थिक विकासासह एकत्रित कामाची संधी भविष्यात उपलब्ध होणार आहे आणि कौशल भारत, कुशल भारत हे वाक्य खरे करून दाखवले जाईल.

 

देशातील प्रमुख कौशल्य विकासाचे स्रोत असलेल्या एआयसीटीई (शिक्षण मंत्रालयअंतर्गत) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयांतर्गत) द्वारे भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण अशा आर्थिक सेवा समूह असलेल्या, बजाज फिनसर्वसोबत एकत्र येऊन पदवीधर तरुणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. करारामुळे बँकिंग, आर्थिक आणि इन्श्युरन्स प्रमाणपत्र कार्यक्रम कौशल्य विकासाचा, १०० तासांचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे ज्याच्या माध्यमातून २० हजार उमेदवार तयार केले जातील.

 

या अभ्यासक्रमाची निर्मिती ही उद्योगतज्ज्ञ, प्रशिक्षण भागीदार, शैक्षणिक संस्था आणि मानसशास्त्रीय आरोग्य संस्थांचा मदतीने करण्यात आलेली आहे. सध्या सुमारे ३५० पेक्षा अधिक महाविद्यालयात २३ राज्य, १०० जिल्हे आणि १६० पेक्षा अधिक गावांमधून कार्यरत आहे. यांचा हेतू हा कौशल्य, शिक्षण आणि तरुण पदवीधर आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांमध्ये नेमका आत्मविश्वास निर्माण करण्याचा आहे. असे केल्याने रोजगार क्षमता निर्माण होत असतानाच आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये दीर्घकालीन कामाचा टिकावा लागावा म्हणून योग्य ते निर्णयदेखील ते घेऊ शकणार आहेत.

 

Important Links Kaushalya Vikas Vibhag Bharti 2024

PDF जाहिरात
http://bit.ly/38S5cR0
अधिकृत वेबसाईट
kaushalya.mahaswayam.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड