कारागृह विभागासाठी २५५ पदांसाठी लिपिक आणि अन्य पदांची भरती प्रक्रिया सुरू – Karagruh vibhga Recruitment
‘महाराष्ट्रातील कारागृह विभागासाठी नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्यात आली आहेत. विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, कारागृह सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होईल,’ असा विश्वास अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला. गुप्ता म्हणाले, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-लर्निंग, ई-लायब्ररी, व्हर्च्युअल क्लासरूम, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा अशा सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या अद्ययावत सुविधांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा. या कौशल्य प्रशिक्षणातून चांगले अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षक निर्माण होतील.’’
- पदाचे नाव – लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलींग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक
- पदसंख्या – 255 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – www.mahaprisons.gov.in
पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण |
वरिष्ठ लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण |
लघुलेखक निम्न श्रेणी | एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि. |
मिश्रक | एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य) |
शिक्षक | एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य) |
शिवणकाम निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक |
सुतारकाम निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
बेकरी निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक |
ताणाकार | एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
विणकाम निदेशक | शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य ) |
चर्मकला निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
यंत्रनिदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक | एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
करवत्या | चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक. |
लोहारकाम निदेशक | एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. |
कातारी | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. |
गृह पर्यवेक्षक | एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य |
पंजा व गालीचा निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
ब्रेललिपि निदेशक | एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक |
जोडारी | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक. |
प्रिप्रेटरी | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
मिलींग पर्यवेक्षक | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
शारिरिक कवायत निदेशक | एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र |
शारिरिक शिक्षक निदेशक | एसएससी / शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य |
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.