शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक भरती!

निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी; दरमहा 15000 मानधन

आताच प्राप्त नवीन अपडेटनुसार, राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा DEd, BEd उत्तीर्ण बेरोजगार तरूण-तरूणींना शिक्षक म्हणून संधी मिळणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरूवारी घेतला आहे. कमी पटंसख्येच्या शाळांमध्ये नेमलेल्या कंत्राटी शिक्षकास १२ रजा असतील. याशिवाय त्यांना नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास घ्यावे लागतील. त्यांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश द्यावेत. त्या शिक्षकाच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन होईल. त्यात त्याचे काम समाधानकारक नसल्यास त्या कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त केली जाणार आहे. दरम्यान, कंत्राटी शिक्षक मिळाल्याशिवाय त्या शाळांवरील शिक्षकांची बदली केली जाणार नाही. या कंत्राटी शिक्षकांवर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील, असेही शासन निर्णयात नमूद आहे.

Shikshak Bharti Contract

शासन निर्णयातील ठळक बाबी 

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एकजण सेवानिवृत्त किंवा डीएड, बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यास परवानगी
  • निवृत्त शिक्षकाचे वय ७० पर्यंत असावे, तो मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा, त्यांची कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी
  • निवृत्त शिक्षकाची नेमणूक करताना त्यास ज्या गटासाठी घ्यायचे आहे, त्या गटाला सेवाकाळात त्यांनी अध्यापन केलेले असावे
  • कंत्राटी निवृत्त शिक्षक तीन वर्षांपर्यंत नेमला जावा किंवा त्यांचे वय ७० होईपर्यंतच नियुक्ती करावी, तो शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा
  • डीएड, बीएड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील
  • डीएड, बीएडधारक बेरोजगार उमेदवारास सुरवातीला एकाच वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर कालावधी वाढविण्याची संधी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Shubhangi Parasram Patil says

    Maz D.ed. zale ahe. Mla job pahije ahe. Please lavkrat lavkr kalva.

  2. Artika Khadse says

    Education-qualification kai lagte sir

  3. Shilpa bhurke says

    Shikshan kay lagte sir

  4. उदयभान घुले says

    शिक्षण पात्रता काय आहे

  5. Bhushan Wagh says

    मला कोणत्याही कारणास्तव कोणतेही काम करेन पण लगेच सांगा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड