आचारसंहितेचा फटका : कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या ! – Kantrati Shikshak Bharti
निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी; दरमहा 15000 मानधन
Kantrati Shikshak Bharti Update
Kantrati Shikshak Bharti : संचमान्यतेनुसार दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोनपैकी एका रिक्त पदावर डीएड, बीएड् अर्हताधारक उमेदवाराची कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सुमारे ३५० कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सुमारे चौदाशे नियमित शिक्षकांची भरती करण्यात आली होती. शिक्षक भरतीनंतरही सुमारे १,२०० शिक्षकांची पदे रिक्त होती. विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शासनाने १० किंवा १० पटांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ४५० कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने सुशिक्षित डी. एड., बी. एड्, धारकांनी पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समितीस्तरावर १०६ कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती पत्रे दिली. ते संबंधित शाळांवर हजरही झाले. उर्वरित सुमारे ३५० शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने ही भरती प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत थांबविली आहे. ही कंत्राटी शिक्षक भरती सुरू असतानाच काही परजिल्ह्यांतील उमेदवारांनी पोलिस पाटलाचे दाखले घेऊन स्थानिक असल्याची बतावणी केली. ही बाब स्थानिक उमेदवारांच्या लक्षात येताच त्यांनी याविरोधात आवाज उठविला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी तहसीलदारांचा रहिवासी दाखला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्थानिकांना संधीची मागणी
जिल्हा परिषदेने कंत्राटी भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. तसेच आमदार राजन साळवी यांनीही शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भरती प्रक्रियेत स्थानिकांना संधी द्या, अशीही मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली होती
वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडे १ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत; मात्र त्यामध्ये स्थानिकांनाच प्राधान्य द्या, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे; मात्र शिक्षण विभागाकडे प्राप्त अर्जांमध्ये काही परजिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या कंत्राटी भरतीत स्थानिक विरुद्ध परजिल्हा असा वाद रंगण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड्, बीएड् झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक करा, असा शासननिर्णय ५ सप्टेंबरला काढला आहे. त्याप्रमाणे कंत्राटी तत्त्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तसेच त्यांना वर्षाला १२ रजा मिळणार आहेत. या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत २५ सप्टेंबरला हा शासननिर्णय रद्द व्हावा म्हणून आंदोलन केले. रत्नागिरी जिल्ह्यात साधारणत: ६००च्या आसपास शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. त्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मंगळवारपर्यंत ही मुदत होती; परंतु आलेल्या अर्जांमध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. हे मार्गदर्शन मंगळवारी आले आहे. या मार्गदर्शन पत्रात उमेदवार हा स्थानिक असावा, असे स्पष्ट म्हटले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास डीएड् तसेच बीएड् अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा. ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा.
तालुक्यातील उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा, असे या पत्रात म्हटले आहे. जिल्हा परिषद भरती करताना तो उमेदवार मूळ स्थानिक रहिवासी असावा यासाठी सरपंच तसेच पोलिस पाटील यांचे दाखले आवश्यक आहेत; परंतु काही परजिल्ह्यांतील शिक्षक जे सध्या रत्नागिरी कार्यालयात आहेत त्यांनी पत्नीसाठी अर्ज दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्या दाखल्यांची पडताळणी केली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील १० आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांच्या दोन पैकी एक जागेवर कंत्राटी पद्धतीने डी.एड., बी.एड पात्रताधारक उमेदवाराच्या निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना शिक्षण आयुक्तालयाने दिल्या आहेत. त्यानुसार या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा, स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अधिक गुण असलेल्या उमेदवाराचा विचार करावा, तसेच तालुक्यातूनही उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांच्या दोनपैकी एक जागेवर कंत्राटी पद्धतीने डी.एड., बी.एड पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय २३ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे कोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर या कंत्राटी नियुक्तीसंदर्भात शिक्षण आयुक्तालयाने अतिरिक्त सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करणे आवश्यक राहील. तसेच महापालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित महापालिकेच्या शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्याशी, तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा करणे आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाच्या ५ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत. निवड केलेल्या उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावे. निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास दहा पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पद रिक्त नसल्यास १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत नियुक्ती देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासन निर्णयातील ठळक बाबी
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एकजण सेवानिवृत्त किंवा डीएड, बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यास परवानगी
- निवृत्त शिक्षकाचे वय ७० पर्यंत असावे, तो मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा, त्यांची कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी
- निवृत्त शिक्षकाची नेमणूक करताना त्यास ज्या गटासाठी घ्यायचे आहे, त्या गटाला सेवाकाळात त्यांनी अध्यापन केलेले असावे
- कंत्राटी निवृत्त शिक्षक तीन वर्षांपर्यंत नेमला जावा किंवा त्यांचे वय ७० होईपर्यंतच नियुक्ती करावी, तो शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा
- डीएड, बीएड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील
- डीएड, बीएडधारक बेरोजगार उमेदवारास सुरवातीला एकाच वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर कालावधी वाढविण्याची संधी
new udpate
Majhe Education M.A.B.Ed ahe
TAIT Exam dili ahe