कांदाचाळ अनुदान योजना

Kanda Chal Anudan Yojana 2021

Kanda Chal Anudan Yojana – All details about the Kanda Chal Anudan Yojana 2021 are given below. All updates & Details motioned on this page.

महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.

योजनेसाठी प्रमुख अटी :

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

▪कांदाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
▪ 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदानाचा लाभ.
▪कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
▪बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे दाखल करावा.
▪वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद.

आवश्यक कागदपत्रे :

(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :
● विहीत नमुन्यातील अर्ज.
● अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
● वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.
● कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.
● लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा.
● अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
● कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
● अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.
● सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.

(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
● संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
● संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी.
● प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे.
● प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा.
● कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.

लाभाचे स्वरूप असे :

वैयक्तिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी 1 लाख 50 हजार अनुदान दिले जाते. तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या / कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी 7 लाख 50 हजार एवढे अनुदान दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा :
पणन मंडळाचे मुख्यालय / विभागिय कार्यालय / जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समित्या.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा पणन मंडळाचे मुख्य कार्यालय किंवा पणन मंडळाचे विभागीय कार्यालय पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा-



मुख्य कार्यालय
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,
प्लॉट नं.आर-7, मार्केट यार्ड, गुलटेकडी,
पुणे-411 037.
फोन नं.- 020-24261190, 24268297
विभागीय कार्यालय
नविन कॉटन मार्केट यार्ड,
एस.टी.स्टँड समोर, गणेशपेठ,
नागपूर 440 018
फोन – (0712) 2722997
विभागीय कार्यालय
जुने कॉटन मार्केट यार्ड आवार,
अमरावती 444 601
फोन – (0721)-2573537
विभागीय कार्यालय
कृषि उत्पन्न बाजार समिती,नाशिक,
मार्केट यार्ड, नाशिक
फोन – (0253) 2512176
विभागीय कार्यालय
जाफरगेट जवळ,बाजार समिती शॉपिंग सेंटर,
पहिला मजला,
औरंगाबाद
फोन – (0240)-2334168
विभागीय कार्यालय
कृषि उत्पन्न बाजार समिती,
लातूर ,मार्केट यार्ड,
लातूर.
फोन – (02382)212061





महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. ताराचंद धुदाट says

    सर्व कृषी योजना
    कांदा चाळ

  2. ताराचंद धुदाट says

    कांदा चाळीस ऑनलाईन अर्ज कधी करायचा

  3. Wagh nivrutti nanaji says

    Kanda chal anudan

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड