JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कामगार आयुक्तालय Group C भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल! – Kamgar Ayuktalay Bharti 2026

Kamgar Ayuktalay Bharti 2026

महत्वाचा अपडेट समोर आला आहे. मित्रांनो, कामगार आयुक्तालय, मुंबई यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सरळसेवा परीक्षा गट-क २०२६’ भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या भरती अंतर्गत मोठ्याप्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे. वर्तमान निर्णय साप्ताहिक माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अंतर्गत मागवलेल्या माहितीला उत्तर देताना जन माहिती अधिकाऱ्यांनी या भरतीसाठी आलेल्या एकूण अर्जाची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. सरळसेवा कामगार आयुक्त कार्यालय गट-क भरती मधील जाहिरातीनुसार निरीक्षक पदासाठी एकूण ६२ जागा उपलब्ध आहेत, ज्यासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल ३३,१९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या पदासाठी उमेदवारांमध्ये अत्यंत तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Kamgar Ayuktalay Bharti 2026

यासोबतच, लेखापाल पदाच्या १२ जागांसाठी १,०५५ अर्ज आणि लघुटंकलेखक पदाच्या ४ जागांसाठी ३०६ अर्ज कार्यालयास प्राप्त झाले आहेत. अशाप्रकारे या तिन्ही संवर्गातील एकूण ७८ रिक्त पदांसाठी विभागाकडे एकूण ३४,५५४ अर्ज आले आहेत. या भरती प्रक्रियेतील चुरस पाहता, एका जागेसाठी सरासरी ४४३ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असून खरी लढत ‘निरीक्षक’ पदासाठी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदासाठी एका जागेकरिता तब्बल ४४३ उमेदवार आमनेसामने असतील त्यातच या परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल ५२ कायदे अभ्यासासाठी देण्यात आले असून, परीक्षेत ४० प्रश्न ८० गुणांसाठी असणार आहेत; त्यामुळे या कायद्यांच्या अभ्यासावरच परीक्षेत सर्वाधिक भर असणार आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या या उत्तरामुळे आता परीक्षेच्या तयारीला लागलेल्या उमेदवारांना स्पर्धेच्या तीव्रतेचा अंदाज आला आहे. आता या कठीण अभ्यासक्रमाचा वेध घेत सर्वांचे लक्ष परीक्षेच्या तारखांकडे लागले आहे. तर याची परीक्षा पुढील महिन्यात नियोजित आहे.

Kamgar Ayuktalay Bharti 2026 Post Details

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड