लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल परीक्षा १७ एप्रिलला!- Lekha koshagar Junior Accountant Exam on April 17!
Junior Accountant Exam on April 17!
लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल भरतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लेखी परीक्षेची तारीख आणि पॅटर्न जाहीर करण्यात आला असून, परीक्षा १७ एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभागाच्या कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी ७ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता परीक्षेच्या संदर्भात सूचना पत्र जारी करण्यात आले असून, त्यात परीक्षेच्या स्वरूपाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षेच्या आठवडा आधी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, वेळ आणि इतर आवश्यक माहिती असेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षेसाठी दिलेल्या वेळेनुसारच प्रत्येक विभागातील प्रश्न सोडवावे लागतील. उमेदवार एका विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत पुढच्या विभागात प्रवेश करू शकणार नाहीत. तसेच एकदा वेळ पूर्ण झाल्यावर मागील उत्तरांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. परीक्षेच्या अनुषंगाने अधिकृत सूचना पत्र लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर आणि महाभरती वर अद्ययावत माहिती तपासावी.