इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये अॅप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत ही भरती २०२४-२५ करिता केली जात आहे. एकूण ७५० पदांवर भरती होणार असून, महाराष्ट्रात ६० पदे, गोवा ५ पदे, कर्नाटक ३० पदे, गुजरात २५ पदे, आंध्र प्रदेश २५ पदे यासाठी जागा उपलब्ध आहेत.

पात्रता आणि वयोमर्यादा
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी (१ एप्रिल २०२१ ते १ मार्च २०२५ दरम्यान उत्तीर्ण) असावी.
वयोमर्यादा : १ मार्च २०२५ रोजी २० ते २८ वर्षे असावी.
स्टायपेंड आणि प्रशिक्षण कालावधी
अॅप्रेंटिसशिप कालावधी : १ वर्ष
स्टायपेंड :
अर्धनागरी/ग्रामीण भाग – ₹१०,०००/- प्रतिमाह
शहरी भाग – ₹१२,०००/- प्रतिमाह
मेट्रो सिटीज – ₹१५,०००/- प्रतिमाह
निवड प्रक्रिया
ऑनलाइन लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह प्रकार) –
जनरल/फिनान्शियल अवेअरनेस
जनरल इंग्लिश
क्वांटिटेटिव्ह आणि रिझनिंग अॅप्टिट्यूड
कॉम्प्युटर किंवा विषय ज्ञान
प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण, एकूण १०० प्रश्न, ९० मिनिटे वेळ
टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज
राज्यनिहाय मेरिट लिस्ट – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार तयार केली जाईल.
अर्जाची माहिती
अर्ज शुल्क : खुला/इमाव/EWS – ₹८००/-
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ९ मार्च २०२५
अधिक माहिती व अर्जासाठी www.iob.in किंवा www.bfsissc.com वेबसाइटवरील Careers Section ला भेट द्या.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















