बक्कळ पगाराच्या नोकरीची संधी ! JKSSB अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात ; अर्ज कुठे ,कसा करायचा ? ते जाणून घ्या
JKSSB Bharti 2025
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक बक्कळ पगाराच्या नोकरीची संधी चालून आलेली आहे . ज्यांचं शिक्षण वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रात झालेले आहे तर त्यांच्यासाठी ही एक नशीब पालटण्याची संधी ठरेल . तर मग आता जम्मू आणि काश्र्मीर सेवा मंडळाने (JKSSB) २०२५ मध्ये विविध विभागाच्या रिक्त पदाच्या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर केलेली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. पात्र उमदेवार ५ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळाने नियुक्त केलेल्या वेळेच्या मर्यादेत भरतीसाठी अर्ज करावा. भरतीअंतर्गत, स्टाफ नर्स, ज्युनियर फार्मासिस्ट, एएनएम, लॅब असिस्टंट, फूड सेफ्टी ऑफिसर, इलेक्ट्रिशियन, ज्युनियर रेडिओग्राफर आणि ज्युनियर सर्जिकल असिस्टंट यासारख्या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ही पदे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न आणि औषध विभाग यासह इतर विभागांमध्ये पदे भरली जाणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवाराची पात्रता
स्टाफ नर्स: जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) किंवा बी.एससी नर्सिंग उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात
ज्युनियर फार्मासिस्ट: फार्मसीमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेतलेलं असावं लॅब असिस्टंट/रेडिओग्राफर/टेक्निशियन: संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी: अन्न तंत्रज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान किंवा फार्मसी यासारख्या कोणत्याही मान्यता प्राप्त विषयात पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
भरतीसाठी वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे. राखीव श्रेणींना नियमांनुसार वयात सूट मिळेल
दरमहा वेतन : या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १९९०० ते ८११०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. पदाच्या ग्रेड पे आणि पातळीनुसार वेतन दिले जाणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या नियमांनुसार डीए, एचआरए आणि इतर भत्तेही दिले जातील
निवड प्रक्रिया कशी राहील ? : लेखी परीक्षा घेतली जाईल. काही तांत्रिक पदांसाठी कौशल्य चाचणी देखील असू शकते. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. स्टाफ नर्स, ज्युनियर फार्मासिस्ट, एएनएम, लॅब असिस्टंट, फूड सेफ्टी ऑफिसर, इलेक्ट्रिशियन, ज्युनियर रेडिओग्राफर आणि ज्युनियर सर्जिकल असिस्टंट यासाखरख्या पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.